भारताशी नाळ जोडलेले पाकिस्तानी हिंदू बांधव महाकुंभात
07-Feb-2025
Total Views | 51
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pakistani Hindu in Mahakumbh) प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभात जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी येत आहेत. महाकुंभात आतापर्यंत ४० कोटी भाविकांना स्नान केल्याची माहिती आहे. त्याच अनुषंगाने सनातनवर श्रद्धा असलेले पाकिस्तानातील हिंदू बांधवही महाकुंभात पवित्र स्नानासाठी पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील ६८ हिंदू भाविकांचा समूह प्रयागराज येथे आला आहे. महाकुंभाची व्यवस्था आणि भव्यता पाहून सर्व पाकिस्तानी भाविक भारावून गेले होते.
महाकुंभ हा केवळ सनातन श्रद्धेचाच नव्हे तर धर्म आणि अध्यात्माचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. भक्तांसोबत आलेल्या रामनाथजींनी सांगितले की, यापूर्वी सर्वजण हरिद्वारला गेले होते. तेथे त्यांनी सुमारे ४८० पूर्वजांच्या अस्थिकलशांचे विसर्जन केल व त्यांच्या आत्माला सद्गती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना केली.
पाकिस्तानातून आलेले भाविक म्हणतात की, "सनातनच्या श्रद्धेचा धागा आणि महाकुंभात स्नान करण्याच्या इच्छेने त्यांना येथे खेचून आणले. त्यांची अनेक वर्षांची ही इच्छा होती, पण त्यांच्या पूर्वजांचीही अशी आशा होती की त्यांनी कुंभमेळ्यात सहभागी होऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करावे. सनातन आस्थेच्या दिव्य आणि भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचे आभार."