मंदिरातील प्रसाद खाणं म्हणजे सैतान, ख्रिस्ती धर्मांतर करण्यासाठी हिंदूंचे केले ब्रेनवॉश
07-Feb-2025
Total Views | 74
रायपुर : छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून धर्मांतरण (convert) करण्याचा प्रकार समोर आला आहे. साक्री पोलीस ठाण्यातील पाद्री संतोष मेशो आणि पत्नी अनु मेशो या गरीब लोकांना आमिष दाखवत धर्मांतरणाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित माहिती एका पीडितेने दिली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सांगितले की, अहवालामद्ये संबलपुरीमधील रहिवासी उत्तरा कुमार साहू यांनी म्हटले की, त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा नाही. मात्र त्यावेळी त्यांचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच त्यांचे ब्रेनवॉशही करण्यात आले.
दरम्यान साहू म्हणतात की, पाद्री आणि त्यांची पत्नी दोघेही आजारी, असहाय्य, गरीबांना लक्ष्य करतात आणि त्यांना आमिष दाखवतात. हे लोक अशा लोकांना शोधत असतात. तसेच त्यांना चर्चमध्ये बोलावले जाते. प्रार्थना करण्यास सांगितले जाते. त्यांच्या घरी सभाही होत असतात. नंतर मदतीचे आश्वासन दिले जाऊन धर्मांतर करण्यास परावृत्त केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
पास्टर बोला- मंदिरों में प्रसाद खाने वाले शैतान:बिलासपुर में चिकन-मटन खिलाकर और डरा-धमकाकर धर्मांतरण; बेरोजगार, गरीब और महिलाएं टारगेटhttps://t.co/USrWflpnVC
त्याचप्रमाणे जेव्हा महिलांचे पती घराबाहेर असतात तेव्हा त्यांना लक्ष्य करण्यात येते. त्यानंतर महिलांना एका सभेत बोलावले जाते. आणि हिंदू धर्माविरोधात भडकावून विष पसरवले जाते. मंदिरात केली जाणारी पूजा चुकीची कशी आहे. त्याचप्रमाणे मंदिरात वाटण्यात येणारा प्रसाद खाणारा व्यक्ती सैतान असण्याचा अपप्रचार केला जातो. त्यानंतर देवदेवतांच्या मूर्तींवर अघात करण्यास सांगितले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
त्याचप्रमाणे जे लोक खिश्चन धर्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना येशूच्या क्रोधाला घाबरण्यास सांगितले जाते. कोणीही त्याचे विचार बदलू नयेत म्हणून, प्रार्थनेच्या नावाखाली त्यांच्या घरापासून दूर ठेवले जाते आणि त्यानंतर सतत ब्रेनवॉश करण्यात येते. त्यादरम्यान सुमारे ३-४ दिवसानंतर त्यांना चर्चमधून घरी परत पाठवले जाते. तसेच त्यांना मांसाहर खाण्यास अधिक प्रौवृत्त केले जात असल्याची माहिती समोर आली.
हे लोक आता तिच्या मागे लागले असून तिने या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान पोलीसांनी या प्रकरणात लक्ष घालत तपास सुरू केला आहे. आरोपींविरोधात पुरावे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील बोलले जात असल्याची माहिती समोर येत आहे.