दिल्लीत भाजपचीच सत्ता; आणखी दोन नव्या ‘एक्झिट पोल’चा दावा
07-Feb-2025
Total Views | 20
नवी दिल्ली : “दिल्लीत यंदा भाजपलाच बहुमत मिळेल,” असा अंदाज अॅक्सिस माय इंडिया च्या आणि ‘टुडेज चाणक्य’ या दोन मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी समोर आला आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसर्या दिवशी गुरुवारी ‘अॅक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांचे ‘एक्झिट पोल’ प्रसिद्ध झाले आहेत. या ‘एक्झिट पोल’मध्ये भाजपलाच बहुमत दाखविण्यात आले आहे, तर आपला सत्ता गमावावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
‘अॅक्सिस माय इंडिया’च्या आकडेवारीनुसार, भाजपला ७० पैकी ४५ ते ५५ जागा मिळू शकतात. त्याचवेळी, आपला केवळ १५ ते २५ जागांवर समाधान मानावे लागेल, तर काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळतील. ‘टुडेज चाणक्य’ ‘एक्झिट पोल’नुसार, दिल्लीत आम आदमी पक्षाला फक्त १९ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांच्या खात्यात शून्य ते तीन जागा असू शकतात. काँग्रेसला खाते उघडणेही कठीण आहे.