वाघनखे हे स्वराज्याचे शस्त्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    07-Feb-2025
Total Views | 51
 
Fadanvis
 
नागपूर : वाघनखे हे स्वराज्याचे शस्त्र असून त्यांच्यामुळेच आपण श्वास घेतो आहोत, हे लक्षात ठेवायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी केले.
 
नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऐतिहासिक वाघनखांच्या विशेष आकर्षणासह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन दालनाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार उपस्थित होते. दरम्यान, शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी 'वाघनखे' या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. तसेच 'शिवशस्त्रशौर्यगाथा' या शस्त्र आणि वस्तूंची माहिती असलेल्या पुस्तिकेचेही अनावरण करण्यात आले.
 
हे वाचलंत का? -  नवीन नॅरेटिव्ह तयार करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी ज्या वाघनखाचा वापर केला ती वाघनखे महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा उपयोग करत अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून स्वराज्याचे रक्षण केले. आपण इतिहासात सगळ्याच गोष्टी शिकतो. पण पारतंत्र्याच्या काळात ज्यावेळी संपूर्ण देशात अंध:कार होता, आपले संस्कार, संस्कृती, स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म जिवंत राहील की, नाही अशी परिस्थिती होती अशा काळात आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना देव, देश आणि धर्माची लढाई लढण्यास सांगितले. देशातील लोकांवर अत्याचार करणाऱ्या मोगलाच्या जाचातून स्वकीयकांना सोडवून स्वराज्याची स्थापना करण्यास सांगितले. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली आणि चौदाव्या वर्षी अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली. यातील एकेका सरदाराने केलेला पराक्रम आपण इतिहासात वाचला."
 
"आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली आहे. त्यांचे कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित नसून देशात एखाद्या राजाने किंवा शासकाने राज्यकारभार कसा करावा, याचा वास्तुपाठ त्यांनी दिला. पाण्याचे नियोजन, पर्यावरणाचे रक्षण, कायदा-सुव्यवस्था, महिलांच्या बाबतीत संवेदनशीलता काय असते हे सगळे आपल्याला शिवरायांनी शिकवले. छत्रपती शिवराय हे आपले आराध्य दैवत आहेत. या वाघनखांचे दर्शन घेताना ही शस्त्र स्वराज्याची शस्त्र आहेत आणि यांच्यामुळेच आपण श्वास घेतो आहोत, हे लक्षात घ्यावे लागेल," असे ते म्हमआले. तसेच त्यांनी सर्व नागरिकांना वाघनखांचे दर्शन घेण्याचे आवाहनही केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121