महापालिकेचा 'मुंबई आय' प्रकल्प नेमका काय?

"लंडन आय"च्या धरतीवर पालिका बांधणार "मुंबई आय"

    06-Feb-2025
Total Views | 13

mumbai eye

मुंबई, दि.६ : विशेष प्रतिनिधी 
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. आतापर्यंतचा सर्वाधिक ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचे अर्थसंकल्‍पीय अंदाजपत्रक मंगळवार दि.४ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात सादर करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज 'अ', 'ब' आणि 'ग' हे महानगरपालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केले. यंदाच्या अर्थसंकल्पात शाश्वत नागरी सुविधा आणि महसुली खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगानं यंदाही अर्थसंकल्पात मुंबईतील नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आणि सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील खर्चात वाढ करण्यात आली आहे.

भांडवली खर्च २०२४-२५ मधील २२,७८७.१६ कोटी रुपयांवरून २६३५५.७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कोस्टल रोड, जीएमएलआर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशा विविध पायाभूत प्रकल्पांसाठी भांडवली खर्च १०,२१० कोटी रुपयांवरून १३,३१०.९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०२४-२५ मध्ये २८७६३.९४ कोटी रुपये प्रस्तावित महसुली खर्च ३१,२०४.५३ कोटी रुपये करण्यात आला आहे. दीर्घकालीन रणनीती म्हणून विविध विभागांकडून आकारण्यात येणारे विविध शुल्क आणि शुल्कात सुधारणा करून महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यात येणार आहे. मुंबईत विकास प्रकल्पाने बाधित ३७७८२ बांधकामांना पर्यायी जागा देण्यासाठी १०,००० सदनिका खाजगी विकासकाकडून बांधून मिळणार आहेत. यासोबतच अतिरिक्त एफएसआयचा (Floor Space Index) प्रीमियम राज्य सरकार आणि बीएमसी यांच्यात २५:७५ या प्रमाणात वाटून घ्यावा, अशी विनंती महापालिकेने केली आहे.

'लंडन आय'च्या धरतीवर पालिका बांधणार 'मुंबई आय'


मुंबईसाठी विशेष वातावरणीय बदलासाठी ११३.१८ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये सुयोग्य जागी 'लंडन आय'च्या धरतीवर सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत 'मुंबई आय' उभरण्यात येणार आहे. यासोबतच राणीच्या बागेतील प्राणी संग्रहालयात जिराफ ,झेब्रा, सफेद सिंह जॅग्वार इत्यादी विदेशी प्राण्यांसाठी प्रदर्शनी उभारण्यात येणार आहे. शहरातील कोळीवाड्यांच्या विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

• पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

१) १३३३ किमी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण पूर्ण
२) यंदाच्यावर्षी ६९८ रस्त्यांचे काम प्रगतीपथावर तसेच
३) फेज – २ मध्ये १४२० रस्त्यांचे काम अंतर्भूत
३) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात. जलद वाहतुकीसाठी एक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट
कार्यान्वित
४) महामार्गालगत डिजिटल पार्किंग अॅपद्वारे वाहनतळ आरक्षण होणार
५) दक्षिण मुंबईत बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ (रोबोटिक पार्किंग)
६) मरीन ड्राईव्ह कोस्टल रोड : पहिला टप्पा - मरीन ड्राईव्ह ते वांद्रे ९५ % पूर्ण
७) मुंबई कोस्टल रोड दुसरा टप्पा: वांद्रे – वर्सोवा – दहिसर – भाईंदर काम प्रगतीपथावर
८) गोरेगांव – मुलुंड लिंक रोड प्रगतीपथावर
    उड्डाणपुलांच्या कामास गती देणार
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121