दक्षिण कोरियाची नागपूरमध्ये १ हजार ७४० कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाशी सामंजस्य करार

    28-Feb-2025
Total Views | 32
 
Devendra Fadnavis
 
मुंबई: ( Devendra Fadnavis ) महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम असून, दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अ‍ॅडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी सोबत गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी १ हजार ७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि ‘एचएस ह्युसंग’चे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली.
 
“ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी येथे अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादनक्षेत्रात होणार आहे. यामुळे ४०० स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ‘ह्युसंग’ कंपनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच आता नागपुरात आपल्या कार्याचा विस्तार करत असल्याचे पाहून आनंद होत आहे. महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणुकीसाठी पुढे येत राहतील,” असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
‘सह्याद्री’ राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, ‘ह्युसंग कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक सी इयान ली, वरिष्ठ सल्लागार कॅ. शिवाजी महाडकर, संचालक मनोजित साह, उपव्यवस्थापक नीरज हांडा उपस्थित होते.
 
परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम
 
ह्युसंग समूह’ ही दक्षिण कोरियन कंपनी असून टेक्सटाईल्स, केमिकल्स, अवजड उद्योग, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी कार्बन फायबर, अरामिड फायबर, टायर कॉर्ड, ऑटोमोटिव्ह सीट बेल्ट यार्न, हाय-स्ट्रेंथ इंडस्ट्रियल यार्न आणि फॅब्रिक्स यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. ‘ह्युसंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि.’ची हरियाणा, मुंबई, पुणे आणि चेन्नई येथे कार्यालये आहेत.
 
कंपनीचा पुणे येथील प्रकल्प २०१५ पासून कार्यरत असून, येथे ३५० कर्मचारी आहेत. या कंपनीची ८४५ कोटींची वार्षिक उलाढाल आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरिक-शेंद्रा येथे ही कंपनी २०१८ पासून कार्यरत असून येथे ५०० कर्मचारी काम करत आहेत. या ठिकाणीही कंपनीची वार्षिक उलाढाल १ हजार, ६५० कोटी रुपयांची आहे
 
.
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121