भारताला पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग मंत्रालयातर्फे भागधारकांची ‘पॉवरिंग द ब्लू इकॉनॉमी’ ही परिषद संपन्न

    27-Feb-2025
Total Views | 53
sarvanand
 
 
मुंबई : भारत सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग या क्षेत्रासाठी केलेल्या भरीव तरतुदीचा वापर करत भारताला बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग क्षेत्रामध्ये २०३० पर्यंत जगातील पहिल्या दहा देशांत नेण्याचे उद्दीष्ट भारत सरकारचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि सागरी मार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले. भारतीय अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी केल्या गेलेल्या तरतुदींबद्दल या क्षेत्रातील भागधारकांना माहिती देण्यासाठी तसेच त्यातील महत्वाच्या प्रकल्पांबद्दल चर्चा करण्यासाठी ‘पॉवरिंग द ब्लू इकॉनॉमी’ ही परिषद मुंबई येथे संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले. या परिषदेस या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख कंपन्या आणि मान्यवर उपस्थित होते.
 
 
“माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत या क्षेत्रातील महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी या क्षेत्राशी संलग्न सर्व महत्वाच्या सरकारी कंपन्या याही या क्षेत्राला गती देण्याच्या योजनेचा भाग असणार आहेत. तसेच या क्षेत्रातील नाविन्यता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ग्लोबल मेरिटाइम समिटचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये भारतातील तसेच परदेशातील महत्वाच्या कंपन्या यामध्ये सहभागी होतील आणि त्यातून या क्षेत्रासाठी गुंतवणुक आकर्षून घेणे शक्य होणार आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आपल्या संबोधनात केले.
 
या परिषदेत विविध कंपन्यांशी तसेच संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमधून विविध प्रकल्प मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121