हेल्पलाईन क्रमांकाचा प्रचार ते एसटी अधिकाऱ्यांच्या गस्ती...; पुणे अत्याचार प्रकरणी चित्रा वाघ यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

    27-Feb-2025
Total Views | 40
 
Chitra Wagh
 
मुंबई : पुणे अत्याचार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देत काही सूचना मांडल्या आहेत.
 
माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "स्वारगेटमध्ये अत्यंत क्लेशदायक घटना घडली आहे. त्या अनुषंगाने एसटीमध्ये प्रवेश करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न पुढे आला असून यासंदर्भात परिवहन मंत्र्यांनी तातडीने सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आहे. पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी येणाऱ्या दिवसात काय करायला हवे, यासाठी मी माझ्या काही सूचना परिवहन मंत्र्यांसमोर या बैठकीत मांडल्या आहेत."
 
हे वाचलंत का? -  पुणे अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल! तातडीने कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना
 
त्या पुढे म्हणाल्या की, "एसटी ही जीवनवाहिनी आहे. रोज हजारों महिला एसटीने ये-जा करतात. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना चांगल्या सुविधा देण्याबाबत चर्चा झाली. मी माझे निवेदन परिवहन मंत्र्यांना दिले असून त्यावर काम करण्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. महिलांच्या प्रश्नांवर महायुती सरकार गंभीर असून घटनेनंतर काही तासांतच कर्तव्यात कसूर करणाऱ्या २३ सुरक्षारक्षकांचे सरकारने निलंबन केले आहे. या प्रकरणात पोलिसांची किंवा कुठल्याही अधिकाऱ्याकडून हयगय आढळल्यास त्यांना निलंबित करण्यात सरकार हयगय करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम मुख्यमंत्री असताना विरोधकांनी गोंधळ घालण्याची आवश्यकता नाही. आरोपीला शोध घेण्यासाठी जवळपास आठ पथके रवाना झाली असून त्याला कुठल्याही क्षणी अटक होईल. लवकरात लवकर हा खटला चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.
 
अस्तित्वात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
 
शक्ती कायद्याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "कुठलाही कायदा येत असेल तर त्याचे स्वागत आहे. परंतू, आपल्याकडे सध्या जे कायदे आहेत ते प्रचंड सक्षम आहेत. त्यामुळे कायदे वाढवण्यापेक्षा काही कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे. महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी आग्रही भूमिका धरली पाहिजे.
 
चित्रा वाघ यांच्या प्रमुख सूचना कोणत्या?
 
. महिलांसाठी असलेल्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे.
. अडचणीत असल्यास महिलांनी कोणत्या नंबरवर फोन करावा यासाठी बसमध्ये स्टिकरच्या तसेच प्रत्येक एसटी डेपोमध्ये ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करावा.
. डेपोमध्ये पोलिसांची बिट उभी करण्याबाबत विचार व्हावा.
. बस पार्किंगमध्ये उभी असताना तिचे दरवाजे आणि खिडक्या बंद करायला हव्या, जेणेकरून कुणीही आतमध्ये जाऊ शकणार नाही.
. बसचा गैरवापर टाळावा.
. बंद पडलेल्या बसेसच्या आवारात सुरक्षा अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. तसेच याठिकाणी एसटी अधिकाऱ्यांच्या गस्ती वाढवायला हव्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121