Champions Trophy 2025 मध्ये पाकिस्तानी पोलिसांचा सुरक्षा रक्षणाच्या कर्तव्यदक्षपणाला बट्टा
१०० हून अधिक पोलिसांना बडतर्फ करण्यात आले
26-Feb-2025
Total Views | 11
इस्लामाबाद : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) दरम्यान सुरक्षेबाबतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अपयशी ठरलं असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात १०० हून अधिक पोलिसांनी कर्तवदक्ष्यपणाला बट्टा लावला असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम आणि संघाच्या हॉटेलमध्ये पोलिसांना सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र ते कर्तव्यदक्ष भूमिका पार पाडण्यात तत्पर राहिले नाहीत.
सुरक्षा रक्षणाच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला असून पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यात खेळाडूंच्या अपहरणाचे इनपुटही मिळाले आहे. या प्रकरणी आता पंजाब पोलीस महानिरिक्षक उस्मान अन्वर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या कार्यक्रमांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगितले. अहवालानुसार, अतिरिक्त कामाचा ताण आणि जास्त वेळ कामावर असल्याने पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, न्यूझीलंड-बांगलादेशच्या सामन्यादरम्यान, असलेल्या सुरक्षेत आणखी एक त्रुटी समोर आली आहे. एका प्रेक्षकाने सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातून निसटत मैदानात प्रवेश केला आणि किवीचा फलंदाज रचिन रविंद्रला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला ताब्यात घेत पाकिस्तान क्रिकेट स्टेडियममध्ये बंदी बनवले.
पाकिस्तान सरकारने देशातील चॅम्पियन ट्रॉफीच्या सुरक्षेला कोणताही धोका असल्याच्या वृत्तांना पाकिस्तानी सरकार धुडकावत आहे. पाकिस्तानचे मंत्री अत्ताहुल्लाह तरार म्हणाले की, पाकिस्तानात सुरू असलेली स्पर्धा शांततेत पार पडली. स्टे़डियम भरलेले असताना प्रक्षकांचा प्रचंड उत्साह दिसून आला.