अहमदाबाद, दि.२४ : विशेष प्रतिनिधी मुंबई-अहमदाबाद शहरांतील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गातील पुलाचे काम झपाट्याने सुरू असून नुकताच गुजरात मध्ये पाचव्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यात कोसांबाजवळ राष्ट्रीय द्रुतगती मार्ग-४ वरील २६० मीटर लांबीचा पीएससी पूल शनिवार, दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी बांधून पूर्ण झाला. या पुलामध्ये १०४ प्रीकास्ट विभाग आहेत. यात ५० मी + ८० मी + ८० मी + ५० मीटर अशा चार स्पॅनची संरचना आहे. हा पूल बॅलन्स्ड कँटिलीव्हर पद्धतीने बांधण्यात आला आहे, जे मोठ्या स्पॅनसाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे.
नवीन पूर्ण झालेला पूल सूरत आणि भरुच बुलेट ट्रेन स्थानकांच्या दरम्यान स्थित आहे. राष्ट्रीय द्रुतगती मार्ग-४ हा दिल्ली ते मुंबई दरम्यान बांधला जाणारा द्रुतगती मार्ग आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या या पुलाच्या बांधकामाचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले होते, ज्यामुळे वाहनचालक आणि कामगार दोघांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली. तसेच, वाहतूक अखंडित सुरू राहील आणि जनतेला कमीत कमी गैरसोय होईल याचीही विशेष काळजी घेण्यात आली.
गुजरातमध्ये पूर्ण झालेल्या पीएससी पुलांचे तपशील