मुंबई: (Devendra Fadanvis) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक साहाय्याने चारकोप ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावीवाटपाचा कार्यक्रम मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री खा. पीयूष गोयल, माजी मंत्री आ. योगेश सागर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर असतील.
चारकोप येथील ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाजूलाच सेक्टर-1 मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी राजे मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आ. अॅड. आशिष शेलार, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे संचालक व आ. प्रसाद लाड, मुंबई बँकेचे संचालक शिवाजी नलावडे, नंदकुमार काटकर, ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष प्रकाश दरेकर हे मान्यवर उपस्थित असणार आहेत. तर गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, ‘म्हाडा’ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत, अशी माहिती ‘श्वेतांबरा’ गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र दांडेकर, सचिव अनिल सावंत, खजिनदार अमरनाथा कांचन यांनी दिली.