मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक! पुण्यातील रुग्णालयात सुरु होते उपचार
25-Feb-2025
Total Views | 27
पुणे : ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भगवानराव रामचंद्र गोरे यांच्यांवर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, मंगळवारी उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. सातारा जिल्ह्यातील बोराटवाडी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार असून दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल. त्यानंतर ४ वाजता बोराटवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात अंकुश, जयकुमार, शेखर ही तीन मुले, मुलगी सुरेखा, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.