सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला दिनाला विशेष उपक्रम
24-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली: मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित करून आपल्या संस्कृतीत मुलींचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि संविधानाच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. यावेळी महिलादिनी मी एक उपक्रम हाती घेणार आहे, जो आपल्या महिला शक्तीला समर्पित असणार आहे. या खासप्रसंगी, मी माझे ’एक्स’ आणि ’इंस्टाग्राम’सारखे सोशल मीडिया अकाऊंट एका दिवसासाठी देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मन की बात’च्या माध्यमातून रविवार, दि. २३ फेब्रुवारी रोजी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी, विविध विषयांवर भाष्य करताना महिलांविषयी खास उपक्रमदेखील जाहीर केला आहे.
लठ्ठपणाच्या समस्येवर चिंता व्यक्त
“एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल. एका अभ्यासानुसार, आज दर आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्याही चौपट वाढली आहे. दरमहा दहा टक्के कमी तेल वापरण्याचा निर्णय घेता. खाण्यासाठी सोशल मीडिया अकाऊंट एक दिवसासाठी महिलाशक्तिकडे समर्पित खरेदी करताना तुम्ही ते दहा टक्के कमी खरेदी करायचे हे ठरवू शकता. लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये छोटे बदल करून आपण आपले भविष्य अधिक मजबूत, तंदुरुस्त आणि रोगमुक्त बनवू शकतो,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पॅरिस परिषदेत ‘एआय’बद्दल भारताचे कौतुक
“भारत आणखी एक क्षेत्र आहे, ज्यामध्ये तो वेगाने आपली मजबूत ओळख निर्माण करत आहे. हे क्षेत्र म्हणजे ’एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ होय. अलीकडेच, मी एका मोठ्या ‘एआय’ परिषदेत सहभागी होण्यासाठी पॅरिसला गेलो होतो. तिथे जगाने या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे खूप कौतुक केले,” असेदेखील पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. वनस्पती, प्राण्यांच्या परिसंस्था केवळ भारताच्या संस्कृतीतच “आशियाई सिंह, हंगुल, पिग्मी हॉग्समध्ये काय साम्य आहे? उत्तर असे आहे की, हे सर्व जगात इतरत्र कुठेही आढळत नाही, ते फक्त आपल्या देशात आढळते. मध्य भारतातील अनेक जमाती बागेश्वरची पूजा करतात. महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान अय्यप्पा यांचेही वाघाशी नाते आहे. सुंदरबनमध्ये वाघाचे वाहन असलेल्या बोनबीबीची पूजा केली जाते. केरळमधील पुलिकालीसारखे अनेक सांस्कृतिक नृत्ये आहेत, जी निसर्ग आणि वन्यजीवांशी संबंधित आहेत. आपल्याकडे वनस्पती आणि प्राण्यांची एक अतिशय चैतन्यशील परिसंस्था आहे. हे वन्यजीव आपल्या इतिहासात आणि संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत,” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
अंतराळ शास्त्रज्ञांच्या टीममध्ये महिला शक्तीचा सहभाग वाढला
“गेल्या महिन्यात, देशाने ‘इस्रो’च्या १०० व्या रॉकेटचे प्रक्षेपण पाहिले. ही केवळ एक संख्या नाही, तर अंतराळ विज्ञानात नवीन उंची गाठण्याचा आपला संकल्पदेखील प्रतिबिंबित करते. ‘इस्रो’च्या यशाची व्याप्ती बरीच मोठी आहे. गेल्या दहा वर्षांत, सुमारे 460 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत आणि यामध्ये इतर देशांचेही अनेक उपग्रह समाविष्ट आहेत. अलीकडच्या काळात एक प्रमुख गोष्ट म्हणजे आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या टीममध्ये महिला शक्तीचा सहभाग सतत वाढत आहे,” असेदेखील पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
दि. २८ फेब्रुवारीला ‘वैज्ञानिक’ बनावे
शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान दिवस साजरा करण्याबद्दल विशेष भाष्य केले आहे. ते म्हणाले, “आपल्या मुलांना आणि तरुणांना विज्ञानात आवड असणे खूप महत्त्वाचे आहे. याबद्दल माझ्या मनात एक कल्पना आहे. ज्याला विज्ञानात रस, आवड आहे त्यांनी एक दिवस वैज्ञानिक व्हावे. म्हणजेच तुम्ही एक दिवस वैज्ञानिक म्हणून घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे आवाहन केले आहे.
खेळाडूंमुळे भारत महाशक्ती बनण्याच्या दिशेने
“हिमाचल प्रदेशातील सावन बारवाल, महाराष्ट्रातील किरण मते, आंध्र प्रदेशातील तेजस शिरसे किंवा ज्योती याराजी या सर्वांनी देशाला नवीन आशा दिल्या आहेत. उत्तर प्रदेशचा भालाफेकपटू सचिन यादव, हरियाणाची उंच उडीपटू पूजा आणि कर्नाटकची जलतरणपटू धिनीधी देसिंधू यांनी देशवासीयांची मने जिंकली. यावर्षीच्या राष्ट्रीय खेळांमध्ये किशोरवयीन विजेत्यांची संख्या आश्चर्यकारक आहे. आपल्या तरुण खेळाडूंच्या दृढनिश्चयामुळे आणि शिस्तीमुळे भारत ‘जागतिक क्रीडा महाशक्ती’ बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, याचा मला आनंद आहे,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.