"बांगलादेश भारताविरोधात गरळ ओकतो...",परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडेबोल सुनावले

    24-Feb-2025
Total Views | 22
 
 
S. Jaishankar
 
नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. बांगलादेशला भारतासोबत असलेल्या संबंधांचा निर्णय घ्यावाच लागेल. रविवारी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी संबोधित केले. बांगलादेश सतत भारताविरोधात विधान करत आहे. तसेच अल्पसंख्यांकांवरही अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यावर एस. जयशंकर यांनी निषेध व्यक्त केला.
 
भारत-बांगलादेशचे १९७१ सालापासून चांगले संबंध आहेत. मात्र, शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आल्यानंतर सर्व परिस्थिती बदलली असून चिंताजनक बाब निर्माण झाली. अल्र्पसंख्यांकांवरील हल्ले म्हणजे गंभीर गुन्हा असल्याचे वर्णन करण्यात आले. या सर्व कृत्यामुळे भारत देशाच्या नजरेमत बांगलादेशचे स्थान नगण्य झाले आहे.
 
जयशंकर यांनी बांगलादेश सरकारला सांगितले की, तुम्ही तुमच्या समस्येमुळे भारताला दोष देऊ नका. आलीकडे ओमानमध्ये बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहिद हुसैन यांची भेट घेतल्यानंतर, जयशंकर दहशतवादाबाबत बोलले. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारवर भारताविरोधात गरळ ओकत भावना भडकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
यावेळी बोलत असताना जय शंकर यांनी स्पष्ट केले की, भारताला स्थिर आणि चांगले संबंध हवे आहेत. परंतु बांगलादेशला आपले आचार आणि विचार स्पष्ट करावे लागतील. दोन्ही देशांनी गंगा पाणी करार आणि सार्क बैठकीसारख्या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121