पुरोगामी रोहित पवारांकडून आस्थेचा बाजार

महाकुंभ च्या नावे प्रसिद्धीचा घाट गंगाजल, रुद्राक्ष माळेसोबत स्वतःच्या पत्रकांचे वाटप

    24-Feb-2025
Total Views | 42

rohit pawar mahakumbh
 
मुंबई  हिंदूना डावलून सत्तेसमीप जाता येत नाही, याची प्रचिती आल्याने पुरोगाम्यांकडून आस्थेचा बाजार मांडण्याचे उद्योग सुरू आहेत. खा. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही महाकुंभात अमृतस्नान करून परतल्यानंतर आस्थेचा बाजार भरवला आहे. त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा घाट रोहित ब्रिगेडकडून घातला जात आहे.
 
सनातन धर्माच्या रुढी, परंपरांवर अत्यंत खालच्या पातळीत विधाने करून झाल्यानंतर हे महाशय थेट दिसले, ते कुंभमेळ्यात! ब्रिगेडींचे शिरोमणी, थोरल्या पवारांच्या नातवाला या पवित्र स्थळी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आयुष्यभर पवारांनी हिंदूंना अंधश्रद्धाळू म्हणून हिणवले आणि पुरोगामित्वाची ‘हिरवी’ शाल पांघरली. पुढे त्यांच्या राजकीय वारसदारांनीही तीच री ओढली. विशिष्ट धर्मीयांच्या मत बेगमीकरिता लांगूलचालनरुपी गालिचे अंथरले. 30-40 वर्षे हे राजकारण चालले खरे, पण ‘एक है तो सेफ है’चे महत्त्व पटलेल्या हिंदूंनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ताकद दाखवून दिली. त्यामुळे बिथरलेल्या रोहित पवारांनी बहुदा पापक्षालनासाठी महाकुंभात अमृतस्नान केले असावे. रोहित यांच्या या कृतीचे कौतुकच. पण, महाकुंभातून परतल्यानंतर त्यांनी जणू आस्थेचा बाजारच मांडला. सपत्निक अमृतस्नान केल्यानंतर रोहित पवार यांनी 15 बाटल्या गंगेचे पाणी सोबत आणले. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्टदेखील शेअर केली. मात्र, हे पाणी छोट्या-छोट्या बाटल्यांमध्ये भरून आता मतदारसंघात वितरित करीत आहेत. त्यावर आक्षेप नोंदवण्याचे कारण नाही. परंतु, त्या बाटलीसोबत स्वतःचा भलामोठा फोटो छापलेले पत्रकही वाटले जात आहे. हिंदूंच्या आस्थेला हात घालून अशा प्रकारे मतांची बेगमी केली जात आहे, हे सुज्ञास सांगायला नको. त्यामुळे ओठावर एक आणि पोटात दुसरे, असे धंदे त्यांनी बंद करावे.
 
दुटप्पी भूमिका
 
त्रिवेणी संगमातील पाणी प्रयोगशाळेत तपासा’ अशी मागणी शरद पवारसमर्थक करीत असताना, रोहित पवार मात्र त्याच पाण्यावर राजकारण शिजवत आहेत. रोहित ब्रिगेडने ‘महाकुंभमेळा’ या नावाने एक गिफ्टपॅक बनवले आहे. त्यात एक बाटली गंगाजल, रुद्राक्षमाळ, त्याला डमरु-त्रिशूळाची जोड आणि रोहित पवारांचा भलामोठा फोटो असलेले पत्रक अशा ऐवजांचा समावेश आहे. या पत्रकात रोहित पवार यांना कुंभमेळ्यात आलेले अनुभव छापण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गिफ्टपॅकवरही ‘रोहित राजेंद्र पवार’ असे ठळक अक्षरात लिहून भगवे उपरणे परिधान केलेला फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. हे गिफ्टपॅक त्यांच्या मतदारसंघात वितरित केले जात आहेत. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121