"होळी सण साजरा कराल तर मुडदे पाडू", कट्टरपंथींकडून हिंदूंवर हल्ला करत जीवे मारण्याची धमकी
24-Feb-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात होळी (Holi Festival) सण सुरू होण्याआधीच कट्टरपंथींयांनी राडा घातला. बरदानी ठाणे क्षेत्रातील हजियापुर वस्तीत काही कट्टरपंथींनी हिंदूंवर हल्ला केला. होळी हा सण जवळ आल्याने सणाची पूर्वतयारीला सुरूवात करण्यात आली. मात्र, कट्टरपंथींनी जर होळी साजरी केली तर मुडदे पाडू अशी धमकीच दिली आहे. यामुळे आता परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी पोलिसांनी वादंग निर्माण करणाऱ्या कट्टरपंथींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संबंधित घटनेच्या अहवालानुसार, हजियापुरात असणाऱ्या स्थानिकांमध्ये लक्ष्मण, मुन्ना, शानि आणि आकाश आपल्या वस्तीत होळीबाबत कार्यक्रमाबाबत चर्चा करत होते. त्यावेळी कट्टरपंथी रेहान, भूरा आणि आलमसोबत काही युवक पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी होळीची चर्चा करणाऱ्यांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लक्ष्मण आणि त्याच्या साथीदारांचे म्हणणे आहे की, होळीच्या सणाआधी करण्यात आलेला हल्ला हे वातावरण बिघडवण्याचे काम आहे. या हल्ल्यादरम्यान, लक्ष्मण, मुन्ना आणि आकाशला दुखापत झाली होती. त्यानंतर पीडितांना पोलिसांकडे धाव घेतली.
बारदरी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्याची परिस्थिती पाहता संबंधित प्रकरण हे फारच संवेदनशील असल्याने पोलिसांनी कोणतीही जोखीम घेतली नाही. या प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दगडफेक करणं हे आजचचं षडयंत्र नाही. कावड यात्रेवरही यापूर्वी दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळीही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यामुळे सांप्रदायिक वादंग निर्माण होऊ लागला आहे.