पाकिस्तानात दाऊद अभियांत्रिकी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी सण साजरा करण्यास विरोध

    23-Feb-2025
Total Views | 39

Holi
 
इस्लामाबाद : पाकिस्तानातील कराचीतील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हिंदूंचा होळी सण साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे  वाद निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या आवारात घोषणाबाजी करण्यात आली होती. अनेक हिंदू विद्यार्थ्यांविरुद्ध एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला.
 
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेचे माजी सदस्य लाल मल्ही यांनी सोशल मीडियावर पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक धार्मिक प्रथांच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. या प्रकरणाला राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधण्यात आले आहे. यावेळी मल्ही यांनी प्रश्न केला की, होळी हा हिंदू सण साजरा करणे आता गुन्हा आहे का? विद्यापीठामध्ये होळी सण साजरा करण्याला विरोध का दर्शवला जात आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आणि त्यांनी पाकिस्तानी धार्मिक अल्पसंख्यांना विषेश म्हणजे, हिंदूंना समोरे जावे लागते. यावरून आता भेदभाव आणि असहिष्णुतेला व्यापक मुद्द्यावरून प्रकाश टाकला जात आहे.
 
दरम्यान, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी साजरा करताना व्हिडिओ आणि प्रशासनाने जारी केलेली कारणे दाखवा. यामुळे आता नोटीशीच्या सार्वजनिक चर्चेला उधाण आले आहे. या नोटीशीत विद्यार्थ्यावर राज्याला आक्षेपार्ह वाटणाऱ्या कृतीमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. हा आरोप अनेक टीकाकार पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या वाढत्या दुर्लक्षाचे प्रतिबिंब म्हणून पाहतात. पाकिस्तानच्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग असूनही, हिंदू समुदायाला दीर्घकाळापासून पद्धतशीरपणे दुर्लक्ष, हिंसाचार आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121