फराह खानच्या 'या' वक्तव्यावर वाद; हिंदुस्तानी भाऊंनी दाखल केली तक्रार!

    22-Feb-2025
Total Views |
Hindustani Bhau Files Complaint Against Farah Khan For Calling Holi A Festival Of
 
  
मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक फराह खान यांनी हिंदू सण होळीबद्दल कथितरीत्या अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी त्यांच्या वकिलामार्फत मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत फराह खानने होळी साजरी करणाऱ्यांना ‘छपरी’ संबोधून हा सण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘छपरी’ हा शब्द सामान्यतः संस्कारहीन किंवा असभ्य व्यक्तींना उद्देशून वापरला जातो, त्यामुळे हा शब्दप्रयोग हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचे हिंदुस्तानी भाऊंनी म्हटले आहे.
 
त्यांचे वकील अ‍ॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अशा वक्तव्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "माझा क्लायंट सुरुवातीपासूनच धर्मविरोधी द्वेष आणि अपमानास प्रवृत्त करणाऱ्या वक्तव्यांविरोधात आवाज उठवत आला आहे. बॉलिवूडसारख्या मोठ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या शब्दांवर नियंत्रण ठेवले पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.
 
या प्रकरणात फराह खान यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस, २०२३ मधील कलम १९६, २९९, ३०२ आणि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कलमांतर्गत धार्मिक भावना दुखावणे, द्वेष पसरवणे आणि जाणीवपूर्वक अपमानकारक विधान करणे यासंदर्भात कारवाई होऊ शकते. तसेच, तक्रारीत फराह खान यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ नुसार असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, खार पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आहे. ही वादग्रस्त टिप्पणी एका टेलिव्हिजन शोमध्ये करण्यात आल्याचा आरोप असून, सोशल मीडियावर तिच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदुस्तानी भाऊ यांनी त्वरित कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत ..

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..