चेन्नई : "मधमाश्यांच्या पोळावर दगड मारू नये. हे प्रकरण भडकवू नये", असा दावा आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या राष्ट्रीय धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. भाषिक आधारावर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचे बेताल वक्तव्य स्टॅलिन यांनी केले आहे. त्यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही तमिळनाडू सरकारवर सुधारणांप्रति रुपांतरीत करण्याचा आरोप केला आहे.
अशातच प्रधान म्हणाले की, "कोणत्याही राज्यावर किंवा समुदायावर कोणतीही भाषा लादण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही", दरम्यान, भाषिक आधारावर राजकारणासाठी जागा शोधणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, "मी केंद्र सरकारला विनंती करतो की, त्यांनी तमिळ लोकांना पुन्हा एकदा भडकावले आहे. मधमाश्यांच्या पोळाला दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. जोवर मी आणि द्रमुक आहोत, तोवर केंद्र सरकारला तमिळनाडूत सत्ता स्थापन करता येणार नाही".
त्यानंतर ते म्हणाले की, "संबंधित योजना ही शिक्षणाच्या विकासासाठी नसून तर हिंदी भाषेला अधिकाधिक प्रोत्सहान देण्यासाठी आहे. लोक अमलबजावणीला विरोध करतील. मात्र ते अंमलात आणत आहेत", असे प्रतिपादन स्टॅनिल यांनी केले आहे. पण तमिळ कसे विकसित करायचे हे आम्हाला माहिती आहे. हिंदी भाषा लादल्याने आपली मातृभाषा गमावली त्यांना याबाबत विचारा. तमिळ लोकांना त्यांच्या विकासासाठी त्यांना पाठिंब्याची आवश्यकता नाही," असे स्टॅलिन म्हणाले.
पुढे स्टॅलिन म्हणाले की, "एनईपीच्या नावाखाली ते आमच्या मुलांना अभ्यास करण्यापासून, शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून तसेच नोकऱ्या मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. शंभर वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे लोकांना छळण्यात आले होते, तेच करत आहेत. सामाजिक न्याय नष्ट करण्यासाठी शिक्षणासंबंधित योजना आणली गेली," त्यामुळे इतर समुदायाची प्रगती रोखली असल्याचे म्हटले.