मुंबई, दि.२२: प्रतिनिधी मध्य रेल्वेमार्गावर अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डर लॉंचींगसाठी अंबरनाथ (सर्व क्रॉसओवर आणि साइडिंग वगळून) आणि वांगणी (सर्व क्रॉसओवर वगळून) दरम्यान, दि. २२/२३ फेब्रुवारी म्हणजेच शनिवार/रविवार मध्यरात्री १:३० ते ०३:०० वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर म्हणजे कल्याण एंड एफओबी येथे १२ मीटर रुंदीचे एफओबी गर्डर (७ नंबर) आणि बदलापूर-वांगणी एफओबी (मीड- सेक्शन) येथे ४ मीटर रुंदीचे एफओबी गर्डर (४ नंबर) लाँच करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक काळात गाडी क्रमांक 11020 (भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोणार्क एक्सप्रेस) कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल येथे थांबेल.
लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेट होणार
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२:१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११:५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -बदलापूर लोकल अंबरनाथ स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होईल. परळ येथून रात्री ११:१३ वाजता सुटणारी परळ-अंबरनाथ लोकल बदलापूर स्थानकापर्यंत जाईल. कर्जत येथून मध्यरात्री ०२:३० (मध्यरात्री) वाजता सुटणारी कर्जत -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जतऐवजी अंबरनाथ स्थानकावरून सुटेल.
ब्लॉकपूर्वी कर्जतला जाणारी शेवटची लोकल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११:३० वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०१:४९ वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल - कर्जत येथून मध्यरात्री ०३:३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०५:५६ वाजता पोहचेल. पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.