शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव असतील. शक्तिकांत दास यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. २०१९ सालापासून पी के मिश्रांसोबतच आता शक्तीकांत दासही या पदाची धुरा सांभळणार आहेत.
गेली ६ वर्षे RBI चे गव्हर्नर म्हणून त्यांनी सेवेचे कार्य केले आहे. त्यानंतर आता शक्तिकांत दास हे डिसेंबर २०२४ मध्ये निवृत्त झाले आहेत. अशातच आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख अर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका बजावतील.
दरम्यान, शक्तिकांत दास हे १९८० साली आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड झाली होती. त्यानंतर २०१८ ते २०२४ सालादरम्यान, त्यांनी काम केले. कोविड १९ या माहामारीच्या काळात देशाची आर्थिक भूमिका बजावण्यात त्यांचा हात होता.
त्यानंतर २०२१ या वर्षात केंद्र सरकारने शक्तिकांत दास यांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच ते भारतीय रिझर्व्ह बँकचे २५ वे गव्हर्नर असल्याचे सांगण्यात येत आहे.