मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Maharana Pratap Statue) हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात सुजानपूर येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटांत वाद निर्माण झाला होता. मात्र सदर पुतळा ठरलेल्या जागेवरच बसवला जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. याबाबतचा निर्णय नुकताच नगर परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे यास विरोध करणाऱ्या मुस्लिम सुधार सभेनेही प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हे वाचलंत का? : पाक लष्कराचा हिंदूंना पाठिंबा? भारतात आलेल्या कराचीतील मुख्य पुजारींचा मोठा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, महाराणा प्रताप यांचा पुतळा सुजानपूरमध्ये सुशोभीकरणादरम्यान प्रभाग ४ येथील उद्यानात (जे सर्व समाजाने मिळून निश्चित केलेले ठिकाण होते) बसवण्याचा निर्णय घेतला होता. मग तथाकथित जिहादी मानसिकतेच्या लोकांनी अचानक जागा बदलण्याची मागणी करण्यात आली. या उद्यानासमोर एक मशीद असून या मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा असेल तर दोन गटात द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते, असा दावा मुस्लीम सुधार सभेचे अध्यक्ष निजामुद्दीन यांनी केला होता. मात्र त्यांनी आपल्या विधानावरून मागे फिरत पुतळा बसवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी उपायुक्त कार्यालयात चुकून पुतळ्याला विरोध केल्याचे सांगितले.
महाराणा प्रताप हे भारतीय अस्मितेचे प्रतिक
स्वतंत्र भारतातही महापुरुषांच्या सन्मानार्थ वापरल्या जाणाऱ्या प्रतिकांना विरोध केला जात आहे, हे दुर्दैव आहे. पाच शतके होऊनही मुघल योद्ध्यांच्या मनातून महाराणा प्रतापांची भीती गेली नाही. हिंदू समाज सुजानपूर नगरपरिषद आणि सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या तरुण पिढीला अशा सकारात्मक विचारसरणीने प्रेरित करण्यासाठी महापुरुषांची प्रतिमा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराणा प्रताप हे भारताच्या अस्मितेचे प्रतिक असून मुस्लिम समाजानेही स्वत:ला भारतीय समजत असेल तर त्यांना भारतीय महापुरुषांचा अवलंब करावा लागेल.
- पंकज भारतीय, प्रांत सहमंत्री, विश्व हिंदू परिषद, हिमाचल प्रदेश