उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी! गाडी बॉम्बने उडवणार असल्याची माहिती

    20-Feb-2025
Total Views | 46
 
Shinde
 
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांची गाडी बॉम्बने उडवणार असल्याचे या ईमेलमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
 
हे वाचलंत का? -  अंजलीताईंनी पुन्हा एकदा अर्धवट...; मंत्री धनंजय मुंडेंकडून आरोपांचे खंडन
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. मुंबईतील अनेक पोलिस स्टेशनमध्ये हा धमकीचा मेसेज आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली आहे. हा धमकीचे ईमेल कुणी केला याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवणार असल्याचे यात म्हटले आहे. या पार्श्वभूमिवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून याबाबतचा सखोल तपास करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. लवकरच हा धमकीचा मेल कुणी केला? हे तपासात पुढे येईल.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121