मुंबई,दि.१९ : विशेष प्रतिनिधी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पाने नुकताच एक माईलस्टोन गाठत महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एससीएलआर विस्तार टप्पा १मध्ये वाकोला फ्लायओव्हरवरील २१५ मीटर ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) स्पॅनच्या यशस्वी लाँचिंगसह एक महत्त्वाचा टप्पा पार केला. मुंबईत अखंड पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणारा एक अभियांत्रिकी अविष्कार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार हा प्रकल्प मुंबई शहरी पायाभूत सुविधा प्रकल्प (MUIP) अंतर्गत नियोजित केलेला आहे. हा प्रकल्प बीकेसीतील महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्राला पूर्व-पश्चिम कनेक्टिवीटी प्रदान करेल. सांताक्रुझ-चेम्बूर लिंकरोडहा बीकेसीला पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणारा एक उड्डाणपूल आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गापासून एलबीएसपर्यंत सांताक्रुझ-चेम्बूर लिंकरोडचा विस्तार होईल, ज्यामुळे नवीमुंबई कडे कनेक्टिव्हिटी निर्माण होईल आणि बीकेसी ते एलबीएस/पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत वेगवान वाहतूक मार्ग निर्माण होईल. एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पात केबल स्टेड पुलाचे बांधकाम देखील करीत आहे. हा पूल वाकोला नाल्यापासून पानबाई आंतरराष्ट्रीय शाळेपासून ते पश्चिम द्रुतगती महामार्गपर्यंत कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. या प्रकल्पाचे सुमारे ९५% स्थापत्य काम पूर्ण झाले असून उर्वरित कामकाज प्रगतीपथावर आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- १०० मीटर तीव्र वक्रतेसह आशियातील पहिला केबल-स्टेड पूल
- जमिनीपासून २५ मीटर उंच, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जाणारा
- कुर्ला ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल विमानतळाला अखंड जोडणी
- स्ट्रक्चरल कार्यक्षमतेसाठी नाविन्यपूर्ण केबल स्टेड पूल
- सुरळीत वाहतूक हालचालीसाठी दोन-लेन कॅरेज-वे