चित्रपट निर्माती एकता कपूरला देण्यात आलेला पद्मश्री परत करण्याची मागणी
१०८ वकिलांनी राष्ट्रपतींना लिहिले पत्र
19-Feb-2025
Total Views | 28
नवी दिल्ली : चित्रपट निर्माती म्हणून नावारुपाला आलेल्या एकता कपूर (Ekta Kapoor) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मात्र, आता पद्मश्री पुरस्कार पुन्हा पुरत करावा अशी मागणी करण्यात आली. भारताच्या विविध भागामध्ये १०८ वकिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना याबाबत पत्रही लिहिले आहे.
संबंधित वकिलांनी एकता कपूरवर वेब सिरीजच्या माध्यमातून समाजाला अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला. एकता कपूरने बनवलेल्या वेब सिरीजवर नैतिक मूल्यांचे पतन निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्यांचेही नुकसान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Appeal by 108 Advocates from Across Bharat for Revocation of Padma Shri Award Conferred on Ekta Kapoor pic.twitter.com/AbOTnhWTwH
दरम्यान, संबंधित प्रकरणावरून त्यांच्या पत्रामध्ये एकता कपूरने बनवलेल्या अशा अनेक वेब सिरीजची माहिती राष्ट्रपतींना दिली. एकता कपूरने तयार करण्यात आलेल्या. या संबंधित वेब सिरीजच्या मथळ्यावरून तरुणांना आणि समाजावर नकारात्मर परिणाम होणार असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.
यामुळे आता पद्मश्री पुरस्काराची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. त्यामुळे पुरस्कार परत करावा अशी मागणी वकिलांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये उल्लखनीय बाब म्हणजे एकता कपूरला २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रात त्यांच्या योगदानाबाबत हा पुरस्कार देण्यात आला आहे.