स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केले स्पष्ट

    17-Feb-2025
Total Views | 53
 
Bawankule
 
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार, असे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आम्ही लोकसभा आणि विधानसभा महायुतीत लढलो असून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासुद्धा महायुतीत लढण्याचा आमचा विचार आहे. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंबंधी असलेल्या सर्व बाबींवर सरकारकडून उत्तर दिले आहे. यावर सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर निकाल लागेल आणि तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे विकासाला बाधा निर्माण होते. त्यामुळे या निवडणूका तातडीने व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे."
 
"सर्वांनी आपापल्या पक्षांची ताकद वाढवली पाहिजे. आम्ही महायूतीमध्ये लढणार आहोत. त्यामुळे आपापला पक्ष वाढवण्याचे काम सुरु आहे. आम्ही १ कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य करतो आहोत. येणाऱ्या काळात ३ लक्ष कार्यकर्त्यांना सक्रीय करणार आहोत. सरकारच्या योजना समाजापर्यंत जाण्यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत," असे त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121