धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण

एसआरएमार्फत करण्यात आलेले आजवरचे सर्वांत मोठे सर्वेक्षण

    15-Feb-2025
Total Views |

dharavi



मुंबई,दि.१५ : विशेष प्रतिनिधी 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बुधवार,दि.१२ फेब्रुवारीला एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत धारावीतील तब्बल ५० हजारहून अधिक घरांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आजवरचे हे सर्वांत मोठे सर्वेक्षणाचे कार्य आहे.

धारावीचा पुनर्विकास हा भारतातील सर्वांत मोठा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे. सुमारे १० लाख लोकांचे निवासस्थान असलेल्या धारावीला आधुनिक शहरी केंद्रात रूपांतरित करण्याचा हा प्रकल्प आहे. सुमारे १.५ लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून धारावीतील नागरिकांना उत्तम घरे, पायाभूत सुविधा आणि आर्थिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत.अनेक आव्हानांना सामोरे जात या धारावीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी अलीकडेच सर्व धारावीकरांना या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून कोणालाही गृह पुनर्वसन योजनेतून वगळले जाणार नाही.

धारावी पुनर्विकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, “८५ हजार झोपड्यांची क्रमवार नोंद पूर्ण झालेली असून ५० हजारहून अधिक झोपड्यांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. धारावीतील गुंतागुंत, अंतर्गत भागात फिरताना येणारी आव्हाने, तसेच खूप मोठी लोकसंख्या हे लक्षात घेता आशियातल्या या सर्वांत मोठ्या झोपडीपट्टीच्या नकाशाचे काम पूर्ण करताना ५० हजार घरांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण होणे ही लक्षणीय बाब आहे.”

नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड(एनएमडीपीएल)चे प्रवक्ते धारावी पुनर्वसन प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाले की, "गेल्या काही दशकांत झालेल्या अनेक अपयशी प्रयत्नानंतर अखेर धारावीचा पुनर्विकास प्रत्यक्षात सुरू झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो झोपडपट्टी पुनर्विकासातला मैलाचा दगड ठरेल. यातून आम्ही सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नक्कीच सूचित होते."
 
"मशालने २००७-०८ मध्ये केलेल्या पूर्वीच्या सर्वेक्षणात धारावीत सुमारे ६० हजार पात्र झोपड्यांची नोंद केलेली होती. सध्याच्या अंदाजानुसार, बहुतेक झोपड्या आता तळमजला आणि वर अधिकचे दोन मजले या स्तरांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे पुनर्वसन आवश्यक असलेल्या झोपड्यांची संख्या सुमारे १.५ लाखांपर्यंत वाढली आहे. सध्याच्या निविदेतील तरतुदींनुसार वरच्या मजल्यांवरील लोकांचाही समावेश केला गेला आहे. सर्वांसाठी घर या सरकारी धोरणाचा भाग होण्याचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे," असे एनएमडीपीएलच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले.

निविदेच्या अटींनुसार, पात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करण्यात येईल. तर अपात्र रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेशात आधुनिक सुविधा आणि सर्वसमावेशक सोयींसह विकसित केल्या गेलेल्या टाउनशिपमध्ये स्थलांतरित केले जाईल. या टाउनशिपमध्ये प्रशस्त रस्ते, उदयाने, तसेच योग्य पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या आवश्यक सुविधा चोख असतील. याशिवाय, या टाउनशिपमध्ये मल्टी-मॉडल परिवहन केंद्रे देखील असतील. हा पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा केवळ स्थलांतरित धारावीकरांचे जीवनमान सुधारणार नाही, तर संपूर्ण परिसर आणि मुंबईकरांच्या जीवनशैलीतही सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा एनएमडीपीएलच्या प्रवक्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121