मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

बंदी घातलेल्या संघटनांमधील ६ जण अटकेत

    14-Feb-2025
Total Views | 48
 
Manipur
 
इम्फाळ : मणिपूर (Manipur) राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर, भाजपचे ईशान्य प्रभारी संबित पात्रा यांनी पक्षाच्या आमदारांशी अनेकदा चर्चेचे आयोजन केले. परंतु या प्रकरणाचा तिढा सुटता सुटत नाही. गेल्या दोन दिवसांपासून संबित यांनी राज्यपाल अजय कुमार यांची दोन वेळा भेट घेतली.
 
अशातच आता भाजपने अद्यापही नवीन मुख्यमंत्र्यांचा चेहरा निश्चित केलेला नाही. काँग्रेस आमदार थोकचोम लोकेश्वर यांनी संबित यांच्या राज्य भेटीचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी भाजपच्या आमदारांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर, नवीन मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीत संबित यांनी मुख्य भूमिका बजवावी, असे त्यांनी सांगितले.
 
१२ व्या मणिपूर विधानसभेचे शेवटचे अधिवेशन १२ ऑगस्ट २०२४ रोजी संपुष्टात आले. तर त्यानंतर १० फेब्रुवारीला होणारे सातवे अधिवेशन राज्यपालांनी रद्द केले आहे. अशातच आता मणिपूरमधील तीन बंदी घातलेल्या संघटनांमधील सहा जणांना अटक करण्यात आली. बुधवारी इम्फाळ दुसरीकडून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या इतर चार जणांना अटक करण्यात आली.
 
इम्फाळच्या पश्चिमेत ओक्राम लीकाईमधून एका सदस्याला अटक करण्यात आली. काकचिंगच्या एरुनपाल भागातून केसीपी सदस्याला अटक करण्यात आली. दरम्यान, बनावट कागदपत्रांच्या आधारे वापण्यात आलेले सुरू असलेल्या सिम कार्डची विक्री केल्याबद्दल मणिपूर पोलिसांनी एफआरआय दाखल करण्यात आला.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121