'मेरा अब्दुल ऐसा नहीं...' म्हणणाऱ्या तरुणींनो सावधान!
व्हॅलेंटाईन डे" च्या पार्श्वभूमीवर मातृशक्तीचे आवाहन
14-Feb-2025
Total Views | 52
मुंबई (ओंकार मुळ्ये) : (Warning on valentine day) भारतात अनेक राज्यांमध्ये ‘लव जिहाद’ संदर्भातील घटना समोर आल्या आहेत. हल्ली ऑनलाईन डेटिंग ॲपच्या माध्यमातूनही हिंदू मुलांच्या नावाचा वापर करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बहुतांश हिंदू मुलींशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले जातात. मग अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडताना दिसतात. 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन प्रेमींमधील प्रेम साजरा करण्याचा तथाकथीत वार्षिकोत्सव असला तरी आजच्या परिस्थितीला हिंदु तरुणींनी सावध असणे तितकेच आवश्यक आहे. विशेषतः 'मेरा अब्दुल ऐसा नहीं...' असे म्हणणाऱ्या तरुणींनी अधिक सावध राहिले पाहिजे.
सुरुवातीला संबंधित महिलेशी भावनिक नाते तयार करून मग तिचा विश्वास संपादित करून कालांतराने या महिलेला इस्लाम धर्म स्वीकारण्यास दबाव तंत्राचा वापर केला जातो. हिंदू धर्मातील मुलींना जाणीवपूर्वक फसवण्याचे काम केले जाते. सोशल मीडियावरील ॲपचा वापर करून जिहादी मानसिकतेचे रोमियो हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. धर्मांतर विरोधी, लव्ह जिहाद विरोधी कायदा येईलच, मात्र हिंदु तरुणींनी आजच सावध होण्याची गरज आहे. व्हॅलेंटाईन डे' हे फक्त एक निमित्त असले तरी हिंदू संघटनांकडून वारंवार याबाबत तरुणींमध्ये जनजागृती यापूर्वी देखील केली. आज पुन्हा एकदा मातृशक्तीने केलेले कळकळीचे आवाहन...
व्हॅलेंटाईनस् नव्हे तर हा आहे वॉर्निंग डे
खरं तर आजचा दिवस युवतीनी ज्यांचा आदर्श घ्यावा अश्या प्रेरक नेतृत्व सुषमा स्वराज यांच्या जयंतीचा दिवस. हा पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस. बाहेरील शत्रूचा थेट हल्ला आपण ओळखू शकतो परंतु व्हॅलेंटाईनडे च्या नावाआड हे एक प्रकारे सांस्कृतिक / धार्मिक कपटी आक्रमण आहे आणि ते वेळीच ओळखणे खूप गरजेचे आहे. प्रेम नक्कीच एक सुंदर अनुभूती आहे.पण ते जर जीवघेणं असेल तर ते प्रेम नाही तर पाशवीपणा आहे. चांद का चक्रव्यूह असलेल्या सापळ्यात अडकलात तर सुटका नाही. तुमचा जीव वाचवण हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. हिंदू युवतींना एक सावधगिरीचा प्रेमपूर्वक इशारा.
- प्रिया सावंत, कोकण प्रांत उपाध्यक्षा, विश्व हिंदू परिषद
तरुणींनो वेळीच सावध व्हा
गेल्या तीन वर्षात पाहिलं तर लव्ह जिहादच्या साधारण १५० नोंदी झाल्याचे निदर्शनास आलंय. ज्यामध्ये विक्टीम हिंदू तरुणी असते आणि आरोपी जिहादी वृत्तीचा इस्लामिक कट्टरपंथीच असतो. ही बाब व्हॅलेंटाईनस् डे पूरतं मर्यादित नाही. तर लव्ह जिहाद हा दीर्घकाळ चालत आलेला मुद्दा आहे. त्यामुळे तरुणींनो वेळीच सावध व्हा!
- शेफाली वैद्य, लेखिका
असुरोंका संघार करने वाली बन!
"१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली योजनाबद्ध रीतीने लव्ह जिहादसारख्या कटकारस्थानांमध्ये तरुणींना अडकवले जाते. पालकांनी, समाजाने आणि तरुणांनी जागरूक राहून या षडयंत्रांना वेळेत ओळखले पाहिजे. अल्पवयीन तरुणींना त्यांच्या शिक्षण आणि करिअर पासून पतभ्रष्ट करून त्यांना लव्ह जिहाद मध्ये ओढण्याचे कुटील कारस्थान उधळून लावण्यासाठी या विदेश पद्धतींचे फॅड समाजप्रबोधनाद्वारे समूळ नष्ट करायला हवे. मी एक आई म्हणून तरुणींना एकाच आवाहन करते 'कली नहीं तू काली बन, असुरोंका संघार करने वाली बन!'."