शरद पवार गटाच्या मते भिडे गुरुजींचे धारकरी 'हिंदू आतंकवादी'

    14-Feb-2025
Total Views |


Dharkari

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vikas Lawande)
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी धारकऱ्यांना 'हिंदू आतंकवादी' म्हणत पुन्हा एकदा गरळ ओकल्याचे निदर्शनास आलंय. 'सत्याग्रही' नावाच्या युट्युब चॅनलवर दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे उपाख्य भिडे गुरुजी आणि समस्त धारकरींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'धर्मांतरासाठी आमिष आणि रायगडावर तालिबानी पाठशाळा' या शीर्षकाखाली केवळ लाईक्स, व्ह्यूज आणि सबस्क्राईबर्स वाढवण्याच्या भूकेपोटी त्यांनी हा व्हिडिओ केल्याचंच दिसतंय.

विकास लवंडेंनी धारकऱ्यांना संबोधत म्हटलंय की, त्यांना स्वतःची सदसद विवेकबुद्धी वापरायची नसते, त्यामुळे धारकरी हे आतंकवाद्याच्याच मोडमध्ये जाणारे असतात. गडकिल्ले मोहिम राबवण्याच्या प्रकारातून त्यांची माथी भडकवली जातात. हा हिंदू आतंकवादी बनवण्याचा प्रकार आहे." भिडे गुरुडजींच्या व्यक्तिमत्वाचा आणि धारकरींचा जाहीरपणे अपमान करणाऱ्या विकास लवंडेंचे हे विधान समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले असून, याबबात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

यापूर्वी शरद पवारांनी पोसलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी पवारांच्या समक्ष स्वामी समर्थ तसेच प्रभु श्रीरामांबाबत अश्लाघ्य भाषेत टिपण्णी केली होती, तेव्हा पवार काही बोलले नाही. आज त्यांच्याच एका कार्यकर्त्यांने भिडे गुरुजींबाबत वादग्रस्त विधान केले. वोटबँक म्हणून निव्वळ एका विशिष्ट गटाला खूष करण्यासाठी शरद पवार हिंदुविरोधी भूमिका घेताना आजवर दिसले आहेत. त्याचा फटका त्यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसलाही, परंतु पवारांची भूमिका काही बदललेली दिसत नाही. तेच गुण आता विकास लवांडेंसारख्या काही कार्यकर्त्यांमध्ये उतरताना दिसतायत.
 
विकास लवांडे आपल्या मतावर ठाम
'दै. मुंबई तरुण भारत'ने शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते आपल्या मतावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान आणि धारकऱ्यांचे गेल्या काही वर्षातील काम आणि त्यांची भूमिका पाहता त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यांनी हे विधान केल्याचेही सांगितले.
 
हिंदुत्ववादी कधी आतंकवादी बनू शकत नाही
सत्तेत नसतात तेव्हा पवार साहेबांचे बगलबच्चे समाजात तेढ कशी निर्माण होईल याकडे लक्ष देऊन असतात. त्याची अनेक कारणे असतील, परंतु माझ्यामते पहिलं म्हणजे त्यांच्याकडे सध्या काही काम नाही. अशी विधाने करून हिंदुत्ववाद्यांवर निशाणा डागलल्यास लांडे तरी आपल्याला समजतील, जेणेकरून करपलेली भाकरी पुन्हा भाजायला रान मोकळं. त्यामुळे अशा पोकळ आरोपांना दुर्लक्ष करायचं असतं, कारण हिंदुत्ववादी कधी आतंकवादी बनू शकत नाही. आदरणीय भिडे गुरुजींनी तयार केलेला एक एक व्यक्ती हा राष्ट्रभक्त आहे, तिथेच पवार साहेबांचा मानसपुत्र जितेंद्र आव्हाड हा किडनॅप केस मधे जामिनावर बाहेर आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्याने समाजाला संस्कार देण्याची भाषा करावी हे हास्यास्पद आहे.
- अनंत करमुसे

जनतेने निवडणुकीत झिडकारल्याची पोटदुखी
वैचारिक उंची नसलेल्या विचारांच्या दबावाखाली येऊन कुठलीतरी माहिती नसताना असे विधान करणे पूर्णतः निषेधार्थ आहे. त्यांनी लवकरात लवकर शिव तपस्वी श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांची माफी मागावी. महाराष्ट्रातील सर्व तरुणांना आपली जात पात विसरून देशासाठी, धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे विचार आणि खरा इतिहास पोहोचण्यासाठी ज्यांनी आयुष्याचा क्षण आणि क्षण खर्च केला त्या शिवतपस्वी गुरुजींवरती याची बोलायची लायकी नाही. महाराष्ट्रातला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला कारण यांना जनतेने झिडकारलं, याची पोटदुखी होत असल्याने अशी वक्तव्य यांच्याकडून होत असावी.
- शंतनू खेडकर, सदस्य, राज्याभिषेक समारोह संस्था, ठाणे

माफी मागावी; अन्यथा करेक्ट कार्यक्रम
विकास लवांडेंचा बोलविता धनी कोण आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ज्यांची वैचारिक सुंता झालेली आहे. ह्या दळभद्रांनी हे ध्यानात ठेवावे की तुम्ही शिवभक्तांना ललकारत आहात. लाखो शिवभक्तांना वंदनीय असणाऱ्या भिडे गुरुजींबद्दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राबवित असलेल्या मोहिमेबद्दल आपण अशा प्रकारच्या असभ्य भाषेत बोलाल तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होऊन बसेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट आम्हाला तीर्थक्षेत्रांसमान आहेत. गडकिल्ल्यांवर मोहिमेच्या निमित्ताने जाणाऱ्यांना जर हिंदू आतंकवादी म्हणून तुम्ही संबोधित करणार असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. दोन दिवसात विकास लवांडेने माफी मागितली नाही, तर समस्त शिवशंभू भक्त अशा प्रवृत्तीचा योग्य त्या पद्धतीने करेक्ट कार्यक्रम करतील.
- अभय जगताप, कोकण प्रांत संयोजक, शिवशंभू विचार मंच

अग्रलेख
जरुर वाचा
हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्राममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..