वॉशिंग्टन डीसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे परदेश दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि भारत-अमेरिकेच्या संबंधांवर चर्चा केली. तेव्हा, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना व्यापार करारांबाबत एक प्रश्न करण्यात आला. त्यावर पत्रकाराने जकातीच्या बाबतीत सर्वाधिक कोण कठोर? असा प्रश्न केला होता.
या प्रश्नाला उत्तरत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच्याहून चांगले वाटाघाटी करणारे आहेत. दरम्यान, या भेटीआधी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या भेटीला काही तासांआधी सर्व देशांवर परस्पर शुल्क व्यापर करण्याची घोषणा केली. त्या संदर्भामध्ये ट्रम्प म्हणाले की, ते माझ्यापेक्षा खूप कठोर वाटाघाटी करणारे आहेत. यामध्ये कोणतीही एक स्पर्धा होणारी नाही.
परस्पर शुल्कांबाबत विशेषत: बोलत असताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, कर आणि जकाती हे परस्पर असून योग्यच आहे. आपला मुद्दा स्पष्ट करत असताना ते म्हणाले की, वेळ काळानंतर अमेरिकेने अमेरिकन निर्यातीवरील जकाती कर कमी आकारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते निष्फळ ठरल्याने, आम्ही आता अगदी तशाच पद्धतीने परस्पर शुल्क आकारण्याचा निर्णय घेत आहोत, मात्र यापूर्वी कोणी केलं नव्हते, असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
भारत आणि अमेरिकामधील टॅरिफ आणि संभाव्य व्यापाराच्या करारांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प उत्तरले. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत", तसेच आम्ही भारत आणि अमेरिकेसाठी काही अनोखा व्यापाराचा करार करणार आहोत, असे प्रतिपादन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.