अमेरिकेत पोहोचताच पंतप्रधान मोदींनी घेतली तुलसी गॅबार्ड यांची भेट
13-Feb-2025
Total Views | 37
वॉशिंग्टन डी.सी. : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. नुकतेच तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर आता ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. तिथे पोहोचताच भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे तिथे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड (Tulsi Gabbard) यांची भेट घेतली आहे. दहशतवाद आणि इतर धोक्यांपासून बचाव करण्यासाठी दोन्ही देशांमधील संवाद अधिक सुलभ कसा करता येईल, यासंदर्भात यावेळी द्विपक्षीय चर्चा झाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर तुलसी गॅबार्ड यांच्यासोबत झालेल्या भेटीविषयी माहिती देत पोस्ट केली आहे. तुलसी गॅबार्ड यांचे यावेळी गुप्तहेर खात्याच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मोदींनी अभिनंदन केले आहे. तसेच, दोन्ही देशांमधील मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत कशी करता येईल, यावर चर्चा झाल्याचे मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.