मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच भारतीय वन सेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). पाटील या २०१० च्या तुकडीच्या अधिकारी असून त्या भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या पहिला महिला अधिकारी आहेत. (anita patil director)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संचालकपदी यापूर्वी पूर्णवेळाकरिता महिला अधिकाऱ्याची नेमणूक कधीच झाली नव्हती. मात्र, आता राज्याच्या सर्वच प्रमुख पदांवर महिला अधिकारी कार्यरत असताना राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर देखील अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील या २०१० च्या भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. २००५ साली त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेची परिक्षा दिली होती. मात्र, भारतीय वन सेवेत काम करण्याच्या इच्छेने त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत काम करत असताना यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. २०१० साली त्या यूपीएससी उत्तीर्ण झाल्या. २०१० ते २०१२ या दोन वर्षात प्रशिक्षण पूर्ण करून २०१२ त्यांची नेमणूक उपवनसंरक्षक नाशिक (पश्चिम) या पदावर करण्यात आली. २०१७ साली त्या जुन्नर जिल्ह्याच्या उपवनसंरक्षक म्हणून रूजू झाल्या. २०१८ साली त्यांची नेमणूक उपवनसंरक्षक, संशोधन या पदावर करण्यात आली. २०२१ साली त्यांची नियुक्ती उपवनसंरक्षक, वर्किंग प्लॅन पदावर झाली. त्याच साली त्यांनी राज्य महिला आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली. २०२१ ते २०२४ या दरम्यान त्यांनी उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष म्हणून काम पाहिले. २०२४ साली त्यांना मुख्य वनसंरक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. तेव्हापासून त्या मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण या पदावर कार्यरत होत्या. आता त्यांची बदली राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर करण्यात आली आहे.