शिंदेंच्या बड्या नेत्याच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या ३ खासदारांची हजेरी!

    13-Feb-2025
Total Views | 145
 
Shinde
 
नवी दिल्ली : शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उबाठा गटाचे तीन खासदार उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
 
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आोयजित केला होता. या स्नेहभोजनाकरिता उबाठा गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
 
हे वाचलंत का? -  राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
 
दरम्यान, गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून हे स्नेहभोजन त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यांनी आपल्या खासदारांसोबत बैठक घेऊन जाण्यापूर्वी परवानगी घ्या, अशा सूचनाच त्यांनी आपल्या खासदारांना दिल्याची माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे.
 
एकीकडे संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर सातत्याने टीका येते. मात्र, आता त्यांचेच खासदार शिंदेंच्या खासदाराच्या घरी स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेला त्यांच्याच खासदारांचा विरोध आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121