पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'एआय'वर भाष्य

अॅक्शन समिटमध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सामील

    12-Feb-2025
Total Views | 27
 
Narendra Modi
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय अॅक्शन समिटमध्ये त्याचे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत सामील होते. पंतप्रधानांनी या परिषदेचे सह-अध्यक्षपदही भूषवले. या परिषदेत १०० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआयचे महत्त्व पटवून दिले आहे.
 
एआय परिषदेला संबोधित करत असताना पंतप्रधान म्हणाले की, एआयशी संबंधित एक मोठी भीती निर्माण झाली आहे. एआयमुळे नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती युवकांमध्ये आहे. परंतु यामुळे एआय तंत्रज्ञान हाताळण्यासाठी युवकांची आवश्यकता असणार असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तर याआधीही नवनवीन तंत्रज्ञान आले होते. तेव्हाही नोकऱ्या जाणार अससल्याचं बोललं जात होतं. मात्र तसं झालं नाही.
 
ते म्हणाले की, एआयचा वाढता प्रभाव लक्षात घेता, भारतात अनेक स्टार्ट-अप्स आणि तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. अनेक भारतीय एआय स्टार्ट-अप्स रोबोटिक्स, आरोग्यासेवा, भाषांतर अशा क्षेत्रात काम करत आहेत. तसेच नंतर ते म्हणाले की, शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी एआय उपयुक्त ठरले आहे.
 
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एआयचे अनेक धोके, एआय नियंत्रण, एआय सेवा, फायदे आणि जगातील सर्व देशांनी एआयचा समान वापर याबाबत पंतप्रधान म्हणाले की, यंत्र हे मानवाचे मालक असू शकत नाहीत, अशा स्थितीमध्ये प्रत्येकाला आपली जबाबदारी समजून घ्यावी लागणार आहे.
 
पुढे पंतप्रधान म्हणाले की, भारतात एआयचा अवलंब करण्यासाठी सार्वजनिक हितासाठी एआय अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी आणि डेटा गोपनिय ठेवण्यासाठी काम करत आहे. भारतात एआय या तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी कुश कर्मचारी वर्गही असल्याचे म्हणाले. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121