मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी त्यांच्या विमानाला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली. यासंबंधित माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आली. ज्या व्यक्तीने फोन केला त्याला अटक करण्यात आली. तसेच तो युवक मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी हे परदेशाच्या दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करु शकतात, असाही इशारा देण्यात आला. माहितीचे गंभीर स्वरुप समजून घेत असताना पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसांकडून माहिती समोर आली. दरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीला चेंबूरमध्ये अटक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी फ्रान्स आणि अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. ते बुधवारी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
On February 11, 2025, Mumbai Police launched a probe after receiving a call warning of a potential terrorist attack on Prime Minister Narendra Modi’s aircraft. The threat came as he departed for a diplomatic visit to France and the United States, prompting heightened security and… pic.twitter.com/IWPMSyNubK
अशातच आता नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचा हा मुंबई पोलिसांना पहिलाच फोन आलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ज्यात दोन कथित आयएसआय़ एजंट्सचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.