'घुसखोरमुक्त दिल्ली’चे नवे सरकारसमोर आव्हान

    10-Feb-2025   
Total Views | 35

delhi
 
दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या सत्ताकाळात अनेक घुसखोरांनी दिल्लीमध्ये स्वत:चे बस्तान बसवले. सरकारी कृपेने सर्व सुविधा मिळाल्याने या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे चांगलेच फावले. या घुसखोरांनी दिल्लीमध्ये आज सर्वत्र हातपाय पसरवले आहेत. त्यांच्या या घुसखोरीचे वास्तव मांडणारा अहवाल ‘जेएनयु’ने जाहीर केला, त्याचा मागोवा...
 
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीने नुकताच ‘दिल्लीमध्ये अवैध अप्रवासी : सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक परिणाम’ हा संशोधनपर अहवाल प्रकाशित केला. दहा वर्षांत राजधानी दिल्लीचे बदलते रुप, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे वाढणारे वर्चस्व आणि दिल्लीचे गुन्हेगारीकरण, यावर संशोधनपर माहिती प्रकाशित केली. या अहवालात नमूद केलेल्या मुद्दयांनुसार कुणाही भारतीयाला वाटलेच असते की, ‘आप’ नव्हे दिल्लीची ‘आपदा’ होती. ‘जेएनयु’च्या अहवालाचा आणि दिल्लीच्या वास्तवाचा या लेखात मागोवा घेतला आहे.
 
दिल्लीची जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात ‘जेएनयु’ने, ‘दिल्लीमध्ये अवैध अप्रवासी : सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक परिणाम’ या विषयावर अहवाल प्रकाशित केला. ‘जेएनयु’च्या प्राध्यापिका मधुरिमा चौधरी आणि सहकार्‍यांनी हा अहवाल तयार केला आहे. गेल्या दहा वषात दिल्लीच्या लोकसंख्येत मोठा बदल झालेला दिसतो. २८० वॉर्डपैकी, १४७ वॉर्डमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढली आहे. कारण, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी घुसखोरी केलेली आहे. पूर्वी पूर्वांचल, उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून लोक रोजंदारीच्या कामासाठी दिल्लीला येत असत. पण, आता या सगळ्या कामावर मजूर म्हणून, बहुसंख्य हे मुस्लीमच आहेत. अत्यंत कमी मजुरीवर आणि कोणत्याही सोई सुविधेशिवाय, हे लोक काम करायला तयार होतात. त्यामुळे यांनाच मजुरीचे काम मिळते, असेही या अहवालात म्हटले आहे. असे काय झाले की, गेल्या दहा वर्षात यांची संख्या दिल्लीमध्ये लक्षणीयरित्या वाढली? तसे पाहता ही वाढ नैसर्गिकरित्या नाही, तर घुसखोरी करून झाली. त्यांच्यावर कारवाई का झाली नसेल? गेली दहा वर्षे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता होती. याच काळात दिल्लीमध्ये हे सगळे कसे काय घडले? याचा मागोवा घेताना गुजरातची ती घटना सांगणे गरजेचे आहे.
 
गुजरातमध्ये इमरान नावाची व्यक्ती ‘फाइटर्स क्लब’ चालवते. मागे त्याने अहमदाबादमध्ये, मुस्लिमांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम केला. गुजरातच्या मुसलमानांनी आम आदमी पक्षाला समर्थन का द्यावे? यासाठी तो त्याच्या भाषणात म्हणाला, “मुसलमानांचे खरे हितैषी केवळ अरविंद केजरीवालच आहेत. अरविंद केजरीवाल सगळ्याच भागातील मुस्लिमांची काळजी घेतात. अगदी मुस्लीम शरणार्थींची सुद्धा ते उत्तम काळजी घेतात. ते मुस्लीम शरणार्थी कोण? त्यांचे मी नाव घेत नाही. तुम्ही तर समजून गेलाच असाल की, ते मुस्लीम शरणार्थी म्हणजे कोण? तर त्यांची सुद्धा केजरीवाल किती काळजी घेतात, त्यांना सगळ्या सोईसुविधा देतात.” इमरानचे हे भाषण प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. इमरानच्या म्हणण्याप्रमाणे, केजरीवाल दिल्लीमध्ये, सगळ्याच म्हणजे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमांनाचीसुद्धा बडदास्त ठेवतात. गेले दशकभर दिल्लीवर सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्याकाळात दिल्लीमध्ये हे सगळे घडले, याला पुष्टी देणारी एक घटना.
 
निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने, दिल्लीमधील हजारो लोकांची नावे मतदान यादीतून वगळली. यावर आम आदमी पक्षाचे नेते म्हणालेे की, “हजारो लोकांची नावे मतदान यादीतून वगळण्यात आली आहेत. हे दिल्लीमध्ये निवास केलेले बिहारचे, प. बंगालचे, उत्तर प्रदेशचे मुसलमान आहेत. ते काय रोहिंग्या आहेत का? की बांगलादेशी आहेत. त्यांचे मतदान यादीतून नाव का काढले?” आम आदमी पक्षाचे नेते सांगत सुटले की, “निवडणूक यंत्रणेने दिल्लीतून इतर राज्यातील मुस्लिमांची नावे मतदार यादीतून वगळली. भाजपचे कटकारस्थान आहे.” यावर दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक लोक आले होते. त्यांचे म्हणणे होते की, “त्यांच्या घरच्या पत्त्यावर, डझनभर लोकांना मतदान कार्ड मिळाले होते. आम्ही तक्रार केली आणि ती नाव वगळली गेली.” या पत्रकार परिषदेमध्ये एक व्यक्ती अत्यंत संतपाने म्हणाला की, “माझ्यासकट माझ्या घरात पाच जण राहतात. मात्र माझ्या घरच्या पत्त्यावर रुबी, आशा खातून, खुशबू निशा, रुखसाना खातून, जहाना खातून, हसीबुर रहमान, अफरोज अंसारी आणि अशाच एकूण ६० लोकांचे, मतदान कार्ड वितरित झाले होते.” यावर दिल्ली भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सचदेवा म्हणाले, “या माणसाच्या घरावरच्या पत्त्यावर आशा खातून, खुशबू निशा, रुखसाना खातून, जहाना खातून, हसीबुर रहमान, अफरोज अंसारी वगैरे वगैरे ६० लोकांच्या नावावर, मतदान कार्ड वितरित झाले. केजरीवालांनी सांगावे, हे लोक त्यांचे नातेवाईक आहेत का?” त्यांनी केजरीवाल यांना हा प्रश्न विचारला कारण, हिंदूंच्या घरच्या पत्त्यावर डझनभर मुस्लिमांना मतदान कार्ड वितरित करणारी, ही एक गुन्हेगारी टोळी होती. या टोळीला दिल्ली पोलिसांनी पकडले. खोटे शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मुख्यत: मतदान कार्ड ही टोळी बनवत असे. बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुसलमानांना, ही खोटी कागदपत्रे बनवून दिली जात. त्या कागदपत्रांच्या जोरावर हे बांगलादेशी किंवा रोहिंग्या, सरकारी योजना आणि सवलतींचा लाभ तर घेतच होते, पण निवडणुकीमध्ये मतदानही करत होते. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या सत्तेमागचे हेच कारण असावे का?
 
असो. ‘जेएनयु’च्या या अहवालामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना दिल्लीच्या कोणत्या भागात घुसखोरी केली, तेसुद्धा स्पष्ट म्हटले आहे. अहवालानुसार, बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान दिल्लीच्या जामिया नगर अर्थात शाहीन बाग, झाकीर नगर अर्थात ओखला, लाजपत नगर, सीलमपूर, सुलतानपुरी, मुस्तफाबाद, निजामुद्दीन, सराय रोहिल्ला, शाहदरा, भालस्वा डेअरी, बवाना, द्वारका, रोहिणी, मोती नगर, कैलाश नगर, खिचडीपूर, सराय काले खान, जाफ्राबाद, खान मार्केट आणि गोविंदपुरी येथे राहतात. हे घुसखोर बेकायदेशीरच राहतात. सरकारी किंवा कुणाच्या तरी वैयक्तिक जागेवर, अतिक्रमण करून ते राहतात. याबद्दल जय हिंद कॅम्प या वस्तीची कथा सगळेच सांगून जाते. ही वस्ती ज्या जागेवर वसली, त्या जागेचे मालक आहेत सतीश कुमार. त्यांच्या जागेवर काही वर्षांपूर्वी अनेक झोपड्या वसवल्या गेल्या. या वस्तीतल्या एका एका झोपडीमध्ये, ४७ किलोवॅट आणि तीन फेजचे मीटर आहेत. त्यांनी त्या संदर्भात कोर्टात केस केली. सतीश या विरोधात कोर्टात गेले. काही वर्षांपूर्वी कोर्टाने निकाल दिला की, अनधिकृत झोपडपट्ट्या हटवाव्या आणि त्यातले मीटरही कापावे. त्यावेळी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार होते आणि सरकारच्या आदेशावर चालणारे दिल्ली प्रशासनही. त्यामुळे कोर्टाचा आदेश असूनही, सरकार आणि प्रशासनाने या झोपडपट्ट्यांविरोधात कारवाई केलीच नाही. सतीश कुमार दिल्ली सरकारकडे आणि प्रशासनाकडे दाद मागून थकले, पण परिणाम शून्य. उलट त्यांच्या जागेवर अतिक्रमण करणारे घुसखोर, त्या जागेच्या नावे सगळी सरकारी कागदपत्रे बनवून भारतीय नागरिक असल्याची बतावणी आज करत आहेत.
 
असो! आता यावर काही तथाकथित निधर्मी पुरोगामी लोक नक्कीच म्हणतील की, या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांविरोधात इतका आक्रोश का? तर “देशातील सर्वच मेट्रो शहरांमध्ये, महिलांवरील अपराधामध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. खुनाचा गुन्हा घडण्यामध्येही दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीत खंडणी वसूल करणार्‍या, गँगही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नशेच्या व्यापारातही दिल्ली पुढेच आहे.” हे माझे म्हणणे नाही, तर काही महिन्यापूर्वीच सत्तेत असताना अरविंद केजरीवाल यांनी, गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनीच दिल्लीचे हे वर्णन केले आहे. या गुन्हेगारीचा आणि दिल्लीमध्ये अवैधरित्या राहणार्‍या घुसखोरांचा संबंध तर असणारच.
 
सुरक्षा यंत्रणेच्या एका अहवालात मागे म्हटले होते की, काही घुसखोरांचे संबंध पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांशी असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच, पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांनी भारतातील रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांसाठी, अर्थपुरवठा सुरु करण्याबाबतही सुरक्षा यंत्रणेने सूतोवाच केले होते. पाकिस्तान आणि बांगलादेशातले कट्टरपंथी भारताला प्रसारमाध्यमातून धमकीच देत असतात की, तुमच्या देशात आलेल्या बांगलादेशी रोहिंग्यांना नागरिकत्व द्या. त्यांच्याविरोधात कारवाई केली, तर आम्ही शांत बसणार नाही.” अर्थात, या धमक्यांना मोदी शाहांची केंद्रातली भाजप सत्ता भीक घालत नाही. त्यामुळेच दिल्लीच्या उपराज्यपालांनी मागेच, दिल्लीत घुुसखोर शोध उपक्रम राबवण्याचा आदेश दिला. संबंध यंत्रणा कामाला लागली आणि दररोज, दिल्लीच्या गल्लोगल्लीतून बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुसलमानांची धरपकड होत आहे. या सगळ्या परिक्षेपात ‘जेएनयु’चा हा अहवाल, महत्त्वाचा आहे. आता कारवाई नाही, तर कधीच नाही. दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. ‘तेरा वैभव अमर रहे मां’ विचारधारेशी निष्ठा असणार्‍या, भाजपची सत्ता दिल्लीत आली आहे. त्यामुळे यापुढे बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांसाठी कायमची दिल्ली दूरच असेल असे वाटते.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील वाघाटी प्रजनन केंद्र ठरतोय पांढरा हत्ती; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच नाही

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty..

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत

"छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिव चरित्राचा अभ्यास करून आपण त्यांच्या ऋणानुबंधाशी जोडले जातो. शिवचरित्र कायम संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांस युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरुष म्हणतात. एक व्यक्ती आणि राजा म्हणून शिवाजी महाराजांचे चारित्र्य अनुकरणीय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपुरातील मुंडले सभागृहात 'युगंधर शिवराय' हे पुस्तक नुकतेच सरसंघचालकांच्या शुभहस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ते बोलत होते. Yug..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121