मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

    08-Jan-2025
Total Views | 17

Marathi language
 
नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना आज दि : ८ जानेवारी २०२५ रोजी जारी केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
 
यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते. सामंत यांनी यावेळी सांगितले, ११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसुचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा कॅबिनेट मंत्री आहे, हा मोठा योगायोग असल्याचे ते म्हणाले.
 
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला शेखावत यांनी येण्याचं मान्य केले असल्याची माहिती त्यांनी योवळी दिली. पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षी ही तेवढीच मदत दिली जाईल, असेही सामंत म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबईतील विलेपार्लेत महापालिकेने ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडल्याने श्रद्धाळूंची निदर्शने

मुंबईतील विलेपार्लेत महापालिकेने ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडल्याने श्रद्धाळूंची निदर्शने

Mumbai Municipal Corporation ने जैन मंदिर पाडल्याने जैन समाजाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. मुंबईतील विलेपार्ले विभागत असणार्‍या ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडण्यात आले. श्री १००८ पाश्वर्थनाथ देरासर, अवैध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले जरी असते तरीही मंदिर समितीच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.मंदिर पाडण्याची स्थगिती देण्यासाठी भाविकांनी अंतिम क्षणी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोणतीही सुनावणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121