कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी भाजपातर्फे ठाण्यात शहरभर शिबिरे

विविध दाखले व प्रमाणपत्रे मिळवण्याची संधी

    04-Jan-2025
Total Views | 32
Thane Camps

ठाणे : केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे दाखले व प्रमाणपत्रांकरिता ठाणे शहर भाजपाच्या ( BJP ) वतीने ठाण्यात शहरभर शिबिरे सुरू झाली आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे भरविण्यात आली आहेत. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.

ठाणे शहरातील शेकडो नागरिकांना विविध दाखले मिळविण्याची प्रक्रिया माहिती नाही. त्यामुळे नागरिकांना सरकारच्या कल्याणकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्व भागात शिबिरे भरविण्यात येत आहेत. जांभळी नाका येथील चिंतामणी ज्वेलर्ससमोर व पाचपाखाडीतील परमार्थ निकेतनसमोर शिबीर सुरू झाले असून, ते ५ जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर कळवा स्टेशन परिसरात ७ ते ९ जानेवारीपर्यंत, राबोडीतील आकाशगंगा रस्त्यावर १० ते १२ जानेवारीपर्यंत, मुंब्रा येथील बाबाजी सखाराम पाटील विद्यामंदिरात १४ ते १६ जानेवारीपर्यंत, मनोरमा नगर येथील डी. ए. कॉलेजपर्यंत १७ ते १९ जानेवारीपर्यंत आणि ज्ञानसाधना महाविद्यालया लगत परबवाडी येथे २१ ते २३ जानेवारीपर्यंत शिबिरे भरविली जाणार आहेत. या शिबिराला भेट देऊन नागरिकांनी अत्यावश्यक कागदपत्रे तयार करून घ्यावीत, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे. जांभळी नाका व पाचपाखाडी येथे झालेल्या शिबिराला भाजपाचे आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, प्रदेश सचिव संदीप लेले, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले, सचिन केदारी, संतोष साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाच्या पत्नीला घेऊन झाला फरार

बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाच्या पत्नीला घेऊन झाला फरार

Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121