दिल्लीत धुक्याची दाट चादर, दृश्यमानतेवर परिणाम

    03-Jan-2025
Total Views | 29
Delhi

नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) शुक्रवारी धुक्याची दाट चादर ( Fog in Delhi ) पसरली होती. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होऊन रेल्वे आणि विमानसेवांवर परिणाम झाला.

शुक्रवारी सकाळी दिल्लीसह संपूर्ण दिल्ली - एनसीआर दाट धुक्याच्या चादरीत लपेटले होते. दाट धुक्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाली होती. यामुळे रहदारीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ९.३० वाजता दृश्यमानता शून्य होती. धुक्यामुळे उड्डाणे आणि रेल्वेसेवाही प्रभावित झाली आहे.

दिल्लीसह एनसीआरमध्ये गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. थंड वारे थंडीच्या लाटेचा प्रभाव दाखवत आहेत. हवामान खात्याने ६ जानेवारीपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळलं; सीमेन्स कंपनीच्या सीईओसह कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल!

(Hudson River Helicopter Crash) अमेरिकेच्या न्यू यॉर्कमधील हडसन नदीत गुरुवार दि. १० एप्रिल रोजी प्रवासी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन मुलांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनहून आलेल्या एका कुटुंबाचा समावेश आहे. मृतांमध्ये सीमेन्स कंपनीचे स्पेनचे अध्यक्ष आणि आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑगस्टिन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचाही समावेश आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121