सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच आढळला 'हा' किंगफिशर; 'ही' आहेत वैशिष्ट्य

    27-Jan-2025   
Total Views | 69
sahyadri tiger reserve black capped kingfisher



मुंबई (अक्षय मांडवकर) -
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त प्रथमच 'काळ्या टोपीचा खंड्या' या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे (sahyadri tiger reserve black capped kingfisher). रविवार दि. १९ जानेवारी रोजी प्रकल्पात पार पडलेल्या 'आशियाई पाणपक्षी गणने'च्या दरम्यान या पक्ष्याचे दर्शन झाले (sahyadri tiger reserve black capped kingfisher). त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील पक्ष्यांचा यादीत भर पडली आहे. (sahyadri tiger reserve black capped kingfisher)
 
 
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त साधारण पक्ष्यांच्या २४४ प्रजाती आढळतात. व्याघ्र प्रकल्पातील शिवसागर जलाशय आणि चांदोली धरणातील पाण्याचा उपलब्धतेमुळे याठिकाणी चांगल्या संख्येने पाणपक्षी देखील सापडतात. या पाणपक्ष्यांची गणना करण्यासाठी रविवार दि. १९ जानेवारी रोजी व्याघ्र प्रकल्पात 'आशियाई पाणपक्षी गणने'चे आयोजन करण्यात आले होते. पक्षीनिरीक्षक आणि वनकर्मचाऱ्यांचे चमू तयार करुन त्यांना व्याघ्र प्रकल्पातील वेगवेगळ्या ठिकाणी एकदिवसीय पक्षी गणनेकरिता पाठविण्यात आले. या गणनेच्या माध्यमातून ३५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. मात्र, यामध्ये लक्षवेधी पक्षी ठरलो तो म्हणजे काळ्या टोपीचा खंड्या. चांदोली राष्ट्रीय उद्यानातून या खंड्याची नोंद करण्यात आली असून व्याघ्र प्रकल्पातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद आहे.
 
 
'चांदोली राष्ट्रीय उद्याना'चे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वातील चमूला या पक्ष्याचे दर्शन झाले. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धाकाळे धबधब्याच्या परिसरात आम्हाला काळ्या टोपीच्या खड्याचे दर्शन झाल्याची माहिती नलवडे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. नलवडे यांनी लागलीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये या पक्ष्याचे छायाचित्र टिपल्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा देखील मिळाला. प्रामुख्याने हा पक्षी किनारी प्रदेशांमध्ये राहणे पसंत करतो. त्यामुळे घाटामाथ्यावरील या पक्ष्याची नोंद महत्त्वपूर्ण आहे.
 
पक्ष्याविषयी...
फार कमी प्रमाणात दिसणाऱ्या काळ्या टोपीच्या खंड्यामधील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्या डोक्यावरील काळ्या टोपीच्या आकारामुळे त्यांना काळ्या टोपीचा खंड्या हे नाव मिळालयं. हा पक्षी प्रामुख्याने स्थलांतरी आहे. मात्र, काही पक्षी भारतामध्ये कायमस्वरुपी अधिवासही करत असावेत. दक्षिण रशिया, उत्तर आणि दक्षिण कोरिया प्रदेशामध्ये हा पक्षी प्रजनन करतो. हिवाळ्यामध्ये तो भारत, पाकिस्तानचा किनारी प्रदेश, श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश, दक्षिण मान्यमार, थायलंड, कंबोडिया, दक्षिण व्हिएतनाम, अंदमान निकोबार बेट, मलेशिया, सिंगापूर, इंडोनिशाया या देशांमध्ये स्थलांतर करतो.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
संतमय वातावरणात पंढरपूरची

संतमय वातावरणात पंढरपूरची 'वारी' या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न!

पंढरीची 'वारी' म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘वारी’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे...

अखेर योग जुळून आला... मुक्ताईं च्या कृपेने थेट दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींशी घेतली भेट!

अखेर योग जुळून आला... मुक्ताईं च्या कृपेने थेट दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींशी घेतली भेट!

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शनातून दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘शिवराज अष्टक' नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121