जागृत चर्चा व्हायला हवी!

    22-Jan-2025   
Total Views | 33

Prof. V. Kamkoti
 
आयआयटी मद्रास’चे संचालक प्रा. वी. कामकोटी (Prof. V. Kamkoti) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओनुसार, “गोमूत्रामध्ये अ‍ॅन्टी-बॅक्टिरियल आणि अ‍ॅन्टी-फन्गल गुण असून, त्यामुळे अनेक रोग बरे होऊ शकतात,” या विधानाचे त्यांनी समर्थन केले आहे. मात्र, यावरून काँग्रसेचे नेते कार्ती चिदंबरम म्हणाले की, “आयआयटी’चे संचालक कामकोटी यांचा बनावटी विज्ञानाचा प्रचार करणे, हे अत्यंत अशोभनीय आहे,” तर डीएमके नेता टी. एस. एलांगोवन यांनी प्रा. कामकोटी यांना ‘आयआयटी’च्या संचालक या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
 
कामकोटी यांची जानेवारी 2022 साली ‘आयआयटी मद्रास’चे निदेशक म्हणून नियुक्ती झाली. गोमूत्रामध्ये औषधी गुण असतात, यासाठीचा आधार म्हणून त्यांनी जून 2021 साली वैज्ञानिक पत्रिका ‘नेचर’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा आधार घेतला. या लेखामध्ये ‘राष्ट्रीय डेअरी अनुसंधान संस्थान’चे ‘पशू जैव प्रौद्योगिकी केंद्र’ आणि ‘सेल बायोलॉजी’ आणि ‘प्रोटिओमिक्स’ प्रयोगशाळेशी संबंधित असलेल्या वैज्ञानिकांनी गोमूत्राच्या गुणासंदर्भात माहिती दिली आहे. वैज्ञानिकांनी या लेखात निष्कर्ष काढला की, गोमूत्रामधले ‘पेप्टाइड्स’ हे मूत्राशी संबंधित विभिन्न जैव गतिविधीसाठी महत्त्वपूर्ण आहे. या निष्कर्षाच्या समर्थनार्थ आणखीन पाच शोध प्रबंधाबद्दलही त्यांनी माहिती दिली. या अनुषंगाने गोमूत्रामध्ये औषधीगुण असतात, असे म्हटल्याने काँग्रेस आणि डीएमकेच्या नेत्यांना इतके चिडायचे कारण काय? तर हिंदूविरोधी राजकारण्यांना हिंदू धर्म श्रद्धा आणि प्रतीके याबद्दल पराकोटीचा द्वेष आणि भीती आहे. गोमूत्र हे औषधी आहे, असे म्हटले तर हिंदूंच्या गोपूजनाला, गोश्रद्धेला मानल्यासारखे होईल. गाईच्या इतर गोष्टी तर सोडाच. पण, मूत्रामध्येही जीवनानुकूलता आहे, असे म्हटले तर हिंदूंच्या गोसंवर्धनाच्या वैज्ञानिक दृष्टीला स्वीकारल्यासारखे आहे. त्यामुळेच काँग्रेससह डीएमके पक्षाला पेाटशूळ उठला. प्रा. कामकोटी यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक श्रद्धा राखण्याचा संविधानानुसार हक्क आहे, हे काँग्रेस आणि डीएमके पक्ष विसरतो. काहीही म्हणा प्रा. कामकोटी यांच्या वक्तव्याने देशभरात गोमूत्रासंदर्भात समर्थन आणि विरोध अशा दोन्ही बाजूने जागृती आणि संशोधन होईल. हिंदू गाईला माता मानतात, यामागच्या वैज्ञानिक कारणासंदर्भात जागृत चर्चा तर होईल.
 
खर्गेंसह वाड्रांचा निषेध!
 
कित्तूरची राणी चेन्नम्मा आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे कर्तृत्व, शूरता, वीरता आणि त्यांचे देदीप्यमान व्यक्तिमत्त्व यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे म्हणतात की, “कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा झाशीची राणी जर कुणी असेल, तर ती आहे प्रियांका गांधी.” प्रियांका वाड्रा यांनी काय बरं पराक्रम केला? काय त्याग केला? काय संघर्ष केला? काँग्रेस आणि समविचारी उद्धव ठाकरे गट असो की, शरद पवार गट असो यांनाही असे वाटले नाही का, असे म्हणून मल्लिकार्जुन यांनी राणी चेन्नम्मा आणि राणी लक्ष्मीबाईंचा अपमान केला आहे?
 
याबाबत मल्लिकार्जुन यांची लाचारी आहे असेच वाटते. कारण, ‘गांधी’ नामधारण केलेल्या फिरोज गांधी यांचे कुटुंब काँग्रेस पक्षाच्या राशीला खिळले आहे. गांधी यांचे वंश राहुल आणि प्रियांका पक्षाच्या चौकटीत कुणाला नेता बनवायचे, कुणाला आमदार-खासदाराचे तिकीट द्यायचे, हे त्यांच्याच हातात. तसेच मल्लिकार्जुन खर्गेंना काँग्रेसचे नामधारी का होईना, पण राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यामध्ये फिरोज गांधी यांच्या या वंशजांचे समर्थन होते, हे मल्लिकार्जुन खर्गे यांना विसरून कसे चालेल? त्यामुळे पद आणि त्याद्वारे चालून येणारे लाभाचे सारे काही टिकवायचे, तर राहुल आणि प्रियांका यांचे तळवे चाटण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायही नाही. खर्गेंसारख्या नेत्यांकडे ना संघटनात्मक करिश्मा ना वैचारिकतेचा करिश्मा. राजकारणात टिकून राहण्यासाठीचा दुसरा स्वस्त मार्ग म्हणजे नेत्यांची चमचेगिरी. त्यामुळे खर्गे हे राहुल, प्रियांका यांची चमचेगिरी करत आहेत. वयोवृद्ध माणसाबद्दल अशी भाषा वापरताना वाईट वाटते. मात्र, त्याहीपेक्षा वाईट आणि संतापजनक वाटते ते मल्लिकार्जुन यांनी राणी चेन्नम्मा आणि राणी लक्ष्मीबाई म्हणजेच प्रियांका गांधी म्हणणे प्रियांका वाड्रा यांचे याबाबत काय मत आहे? राणी चेन्नम्मा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल वाड्राबाईंना माहिती असती, तर त्या स्वत:च लाजेकाजेने म्हणाल्या असत्या की, खर्गे मी म्हणजे राणी चेन्नम्मा किंवा राणी लक्ष्मीबाई होऊच शकत नाही. पण, ‘आम्ही म्हणजेच जग, आमच्या पुढे कोणीच नाही,’ या माजोरड्या वृत्तीतून राहुल आणि प्रियांका बाहेर येतील तर ना? खर्गेंसह वाड्रा बाईंचा आणि काँग्रेसचा निषेध!
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121