आमच्यात कोणतीही नाराजी नाही! पालकमंत्रीपदावर लवकरच मार्ग निघेल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा घेतला आढावा

    21-Jan-2025
Total Views | 88
 
Eknath Shinde
 
सातारा : आमच्यात कोणतीही नाराजी नसून पालकमंत्रीपदावर लवकरच मार्ग निघेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, २१ जानेवारी रोजी स्पष्ट केले. त्यांनी साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी गावी आलो की, लोक म्हणतात नाराज आहे. पण नवीन महाबळेश्वरचा हा मोठा प्रकल्प आहे. त्याच्या मागे मी लागलेलो आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मला अनेकदा गावी यावे लागेल. प्रतापगडापासून तर अगदी पाटणपर्यंत २३५ गावे या प्रकल्पात अंतर्भूत आहेत. आता आणखी २९५ गावांनी याची मागणी केली आहे. त्यामुळे या जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल. इथला भूमिपूत्र म्हणून मला त्यासाठी लागणारे कष्ट घ्यावे लागतील. या भागाचा कायापालट करणे हे एकच माझे उद्दिष्ट आहे. या भागाचा विकास करणे, इथल्या लोकांच्या जीवनात बदल घडवणे, इथला इतिहास आणि संस्कृती जोपासने आणि ती वाढवणे हादेखील आमचा उद्देश आहे," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  दावोसमध्ये कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस यांच्याशी मुख्यमंत्र्यांची बैठक!
 
ते पुढे म्हणाले की, "रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर मार्ग निघेल. तिकीटवाटपापासून तर आतापर्यंतचे सगळे प्रश्न सुटले आहेत. पालकमंत्र्यांचाही प्रश्न लवकर सुटेल. भरत गोगावले यांनी रायगडमध्ये अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवणे आणि मागणी करणे यात चुकीचे नाही. महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही बसून मार्ग काढू," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121