गुहेमध्ये राहणारा भारताचा पहिला राष्ट्रीय प्राणी म्हणून 'या' प्रजातीची झाली घोषणा

    02-Jan-2025
Total Views | 228
Neolissochilus pnar



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
भारतीय गुहांमध्ये अधिवास करणाऱ्या 'निओलिसोचिलस प्नार' (Neolissochilus pnar) या सर्वात मोठ्या माशाला 'राष्ट्रीय केव्ह अॅनिमिल आॅफ द इयर' म्हणून नामांकित करण्यात आले आहे (Neolissochilus pnar). २०२५ सालासाठी हा मासा भारताचा सर्वात पहिला गुहेमध्ये अधिवास करणारा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओखळला जाईल (Neolissochilus pnar). 'स्पेलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया'ने (एसएआय) यासंदर्भातील घोषणा केली आहे. (Neolissochilus pnar)
 
 
'स्पेलिओलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया' ही संस्था 'इंटरनॅशनल युनियन ऑफ स्पेलिओलॉजी' (UIS) आणि 'केव्ह अ‍ॅनिमल ऑफ द इयर" मोहिमेचे भारतीय सदस्य आहेत. या संस्थेला भारतातील गुहेमध्ये अधिवास करणाऱ्या एखाद्या प्राण्याला २०२५ सालासाठी राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार संस्थेतील संशोधकांनी मेघालय राज्यातील गुहेमध्ये आढळणाऱ्या 'निओलिसोचिलस प्नार' या माशाच्या प्रजातीला गुहेमध्ये राहणारा भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून नामांकित केले आहे. या माशाला पहिल्यांदा १९९० साली पाहण्यात आले होते. मात्र, २०१९ साली अभ्यासाकरिता त्याचे नमुने गोळा करण्यात आले. हा मासा गुहेमध्ये अधिवास करणारा जगातील आकाराने सर्वात मोठा मासा आहे. तो दीड फुटापर्यंत लांब वाढू शकतो. गुहेतील अंधारात विकसित झाल्याने हा मासा अंध आहे.
 
 
 
लाईमस्टोन दगडांच्या गुहांमध्ये हा मासा आढळतो. या गुहेमधून वाहणाऱ्या भूगर्भीय नद्या आणि छोट्या तळ्यांमध्ये तो सापडतो. छोटे अपृष्ठवंशीय जीव हे त्याचे खाद्य आहे. या माशाला गुहेमध्ये सापडणारा राष्ट्रीय प्राणी म्हणून नामांकित करुन गुहांमधील समृद्ध प्राणीशास्त्रीय विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. शिवाय भूगर्भीय अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांना प्रकाशझोतात आणणे, हा देखील यामागील एक उद्देश आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121