वक्फ बोर्डाचा हवाला देत कट्टरपंथींनी हिंदूंच्या दुकांनांची केली तोडफोड
कट्टरपंथी आरोपींवर गुन्हा दाखल
02-Jan-2025
Total Views | 104
जयपुर : गुजरात राज्यातील राजकोट येथे दिः ३१ डिसेंबर रोजी काही कट्टरपंथींनी हिंदूंच्या दुकांनांची तोडफोड केली आहे. संबंधित दुकानाची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचा हवाला देत त्यांनी दगडफेक करत उन्माद केला आहे. याप्रकरणी आता २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती आता संबंधित दुकानदारांना समजताच त्यांनी या कृत्याला विरोध दर्शवला.
या दगडफेकीमध्ये पीडितांपैकी एक, वीरेंद्रभाई कोटेचा यांनी राजकोट येथील ए- डिव्हिजन पोलीस ठाण्याचे फारूर मुसानी आणि इतर अज्ञात व्यक्तिंविरोधात तक्रार दाखल केली आहे. ३१ डिसेंबर रोजी काही कट्टरपंथी उशीरा घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी हे कृत्य केले आहे. १ जानेवारी २०२५ रोजी पोलिसांच्या कचाट्यात सापडणाऱ्या आरोपींविरोधात कलम १८९(३), १९०, ३२९(३), आणि ३५१(२) अशी कलमे दाखल करण्यात आली आहेत.
एफआरआयनुसार, ही घटनेमध्ये कट्टरपंथी मुसानी आणि इतरांनी वक्फ बोर्डाच्या आदेशाचा हवाला देत गुजरातच्या जुन्या बदानापीठ परिसरामध्ये असलेल्या दुकानांची तोडफोड केली आहे. त्यावेळी दुकानातील असलेले सामान रस्त्यावर फेकले. यामुळे स्थानिक व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे. ५० वर्षांपासून एका दुकानातून मंडप सेवा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराने या घटनेचा निषेध करत याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
याप्रकरणी तक्रारदाराने सुरूवातीला सांगितले की, दुकाने नवाब मशीद संचालनाच्या हद्दीत आहे. परंतु अनेक दशकांपासून भाडेतत्वावर आहेत. वक्फ बोर्डाने दावा केल्याचा हावाला देत तिच जागा ही बांधकाम विभागाची असल्याचे याप्रकरणातून आता समोर आले आहे. दरम्यान, ज्या दुकानदारांची तोडफोड करण्यात आली त्यापैकी एक व्यक्ती हा तक्रारदार होता.