ऐतिहसिक राम जानकी मंदिरातून ३० कोटी रुपयांच्या अष्टधातु मुर्तींची चोरी, चार सपा नेत्यांना अटक
19-Jan-2025
Total Views | 391
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातून (Ram Janaki temple) ३० कोटी रुपयांच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. ही घटना १३ जानेवारी रोजी घडली असल्याचे वृत्त आहे. चोरी झालेली मूर्ती अष्टधातूची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणात पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी आता यश आले आहे. समाजवादी पक्षाच्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
राम जानकी मंदिरातील पुजारी वंशीदास यांनी चोरीला गेलेल्या मूर्तीप्रकरणी पोलिसांकडे तक्रारीची मागणी केली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस याप्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान तक्रार दाखल केलेला पुजारी वंशीदास याचाही चोरी प्रकरणात हात असल्याचे समजते. पोलिसांनी तक्रारदार वंशीदास, लवकुश पाल, कुमार सोनी आणि राम बहादूर पाल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर हे सपा नेते असल्याचे सांगण्यात येत आहे.
फिर्यादीत नमूद केले की, वंशीदास हे गेल्या तीन वर्षांपासून मंदिराची आणि देवाची सेवा करत होते. त्यांचे गुरु महाराज जयराम दास आणि सातुआ बाबा यांच्यामध्ये मंदिराच्या मालकीवरून बराच वेळ वाद सुरू असल्याची माहिती चौकशीमधून आता उघड झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंशीदासने दर्शनाच्या बहाण्याने या मूर्ती चालक लवकुश पाल, मुकेशकुमार सोनी, राम बहादूर पाल व इतर साथीदारांकडे आणून त्या मूर्ती दाखवल्या. तसेच चोरी केल्यानंतर त्या हैमाई टेकडी मंदिराच्या मागे लवपून ठेवल्या. आरोपींनी शनिवारी १८ जानेवारी २०२५ रोजी मूर्ती घेण्यासाठी आले असता त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.