स्वामीत्व योजना ही ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलविणारी - चंद्रशेखर बावनकुळे

    18-Jan-2025
Total Views |

Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली स्वामीत्व योजना सर्वसामान्याला त्याच्या मालकीच्या जागेचे कायदेशीर सामीत्व मिळावे आणि ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलविणारी ही योजना आहे. या योजनेमुळे कायदेशीर मालकत्व प्राप्त होणार आहे. बँकेचे कर्ज घेण्यासह विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
स्वामित्व योजनेच्या माध्यमातून वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात स्वामित्व योजनेतर्गंत सनद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. स्वामित्व योजनेअंतर्गत नागपूर येथील सनद वाटप कार्यक्रमाला राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी अतुल ठोंबरे, उपजिल्हाधिकारी अनुप खोडे आदी उपस्थित होते.
 
ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आपल्या मालमत्तेचे स्वामित्व मिळावे, जमिनीच्या मालकीमध्ये स्पष्टता यावी, वडिलोपार्जित जमीन व्यवहारातील संभाव्य वाद टाळले जावेत व ग्रामीण भागातील जमीन महसुली प्रक्रियेत सुसूत्रता यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून स्वामित्व योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला हा मंत्र दिला होता. हा नारा ख-या अर्थाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगीकारला आहे. गेल्या दहा वर्षात गावाकडे चला ही भूमिका घेऊन गावांचा विकास होत आहे. समाजातील छोट्या छोट्या घटकांसाठी विविध लोककल्याणाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने स्वामीत्व योजना राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
 
राज्यातील सुमारे ८.५ कोटी नागरिक वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आहेत. या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वयंपूर्ण होत आहे. महाराष्ट्राचे बळकटीकरण हे वैयक्तिक लाभार्थी योजनांच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्यांपासून ते शेतमजुरांपर्यंत योजना राबविण्यात येत आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मिळून सर्वांनी काम करण्याची गरज असून यातून ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलवूया, असे ते यावेळी म्हणाले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात गतीमान आणि पारदर्शी काम करण्यावर भर असणार आहे. येत्या शंभर दिवसात महसुली खात्याने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची गरज आहे. या अनुषंगाने सर्व मुद्रांक कार्यालये ही पासपोर्ट कार्यालये करीत असल्याचे ते म्हणाले. पांदण, शिवपांदण रस्त्यांना आता रस्ते क्रमांक मिळणार आहेत. यातून वेगवेगळ्या योजनेतून या रस्त्यांची कामे करता येणे शक्य होणार आहे. येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बदललेला महाराष्ट् दिसेल. प्रशासनाला विविध योजना व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी वनामती येथील सभागृहात आज सामीत्व योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले.
 स्वामीत्व योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून साधला संवाद

वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात कार्यक्रमात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वामीत्व योजनेतील लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यात नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी त्यात नागपूर जिल्ह्यातील मौजे मल्हापुर येथील रोशन पाटील यांनी माननीय पंतप्रधान महोदयांशी संवाद साधला. विशेष रोशम पाटील यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत संवाद साधला.
 
रोशनचा मुलगा शर्विल यांचा वाढदिवस असल्याने त्याला शुभेच्छा दिल्या पाटील यांना स्वामीत्व योजनेचा लाभ , शासनाची मदत, त्याचा झालेला फायदा, या विषयीची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाच मिनिटाच्या संवादातून करुन घेतली. कुटुंबात असलेल्या सदस्यांची स्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आस्थेने विचारपूस केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121