सोशल मीडियावर वादग्रस्त कविता शेअर केल्याने काँग्रेस खासदार अडचणीत
गुजरात उच्च न्यायालयाची टांगती तलवार
18-Jan-2025
Total Views |
गांधीनगर : काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी (Imran Pratapgadi) यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने प्रतापगडी यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा देण्यास नकार दिला आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवल्यानंतर इम्रानने एका कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर जामनगर पोलिसांनी इम्रान प्रतापगडी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली आहे.
प्रसारमाध्यमाच्या रिपोर्टनुसार, इम्रान प्रतापगडी यांच्यावर गुजरात उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. यानंतर दाखल करण्यात आलेला एफआऱआय रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांनी शेअर केलेल्या कवितेचा व्हिडिओ हा समाजात तेढ निर्माण करणारा आहे. शांतता आणि अहिंसेचे समर्थन करणारा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यावर इम्रान प्रतापगडी यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याची माहिती सांगितली होती.
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप भट्ट म्हणाले की, कवितेतील भाषा आणि तिच्या चालीवरून स्पष्ट होते की, ती सत्ता आणि सत्तेवर भाष्य करते. तसेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर अनेकांनी जातीय सलोखा बिघडवणारी पोस्ट असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आली.
उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये पोलिसांना प्रतापगडीवर खोल चौकशीचे आणि समन्स पाठवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणामध्ये अल्ताफ खफी आणि संजरी एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टची नावे देण्यात आली आहेत.