बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाईला वेग! १२ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
17-Jan-2025
Total Views | 58
रायपूर : केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईला वेग आला असून, १६ जानेवारी रोजी सुरक्षा दलाने बिजापूर येथे १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. बिजापूरच्या दक्षिण भागातील जंगलामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार माओवादी गटाचे अनेक म्होरके या परिसरात तैनात असल्याची माहिती त्यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. गुरूवारी सकाळी ९ वाजता सुरक्षा दलाने या कारवाईला सुरूवात केली.
जिल्हा राखीव रक्षक दलाचे १५०० सुरक्षा कर्मचारी, कमांडो बटालियन फॉर रेसुल्येुट अॅकश्नच्या ५ तुकड्या आणि सीआरपीएफच्या एका तुकडाने ही कारवाई केल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. जानेवारी महिन्यात आता पर्यंत एकूण २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. गुरूवारी झालेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात शसत्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
दोन जवान जखमी!
माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये सुरक्षा दलातील २ जवान गंभीर जखमी झाले आहेत. आयईडी स्फोटकांचा वापर करत, हा हल्ला करण्यात आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले की नक्षलवाद्यांनी जगोजागी आयईडी स्फोटकं पेरली असून, यामुळे सुरक्षा दल, नागरिक, वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. जखमी झालेल्या २ जवानांना रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.यापूर्वी, १२ जानेवारी रोजी, बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार झाले होते. ६ जानेवारी रोजी सुरक्षा दलांच्या वाहनावर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईला वेग आला आहे. या हल्ल्यात आठ सुरक्षा कर्मचारी आणि एका चालकाला आपले प्राण गमवावे लागले होते.