पेपर-पेनच्या साहाय्यानेच होणार नीट परिक्षा, 'एनटीए'चा मोठा निर्णय !
17-Jan-2025
Total Views | 83
मुंबई : नीट-यूजी परिक्षेबाबत ( NEET Exam ) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेश परिक्षा (नीट) लेखी पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय चाचणी कक्ष म्हणजेच एनटीएकडून दि. १६ जानेवारी रोजी परिपत्रक काढण्यात आले. पेपर- पेनच्या साहाय्याने ही परिक्षा घेतील जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
नीट-यूजी ही परिक्षा ऑनलाइन घ्यावी की? पेपर-पेनच्या साहाय्याने घ्यावी? यावर बरीच चर्चा सुरू होती. गेल्या वर्षी या परिक्षेमध्ये जो गैरप्रकार घडला, तो उघडकीस आल्यावर या परिक्षेच्या निर्णयासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने त्यावर योग्य तो तोडगा काढत आपला अहवाल सादर केला. या समितीच्या अहवालानंतर लेखी परिक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्टीय परिक्षा संस्थेकडून या परिक्षेचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट- युजी परिक्षा ही पेन-पेपरच्या माध्यमातून होणार आहे. तसेच ही परिक्षा एकाच दिवशी व एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याचेदेखील जाहीर केलेल्या परिपत्रकात सांगितले आहे.
🚨 NEET UG 2025 to be conducted in Pen and Paper mode (OMR based) in Single day and Single Shift. pic.twitter.com/vXSmJvSY5l